Sunday, May 18, 2025

Buy now

spot_img

मनोज जरांगे-पाटील १ सप्टेंबर रोजी मालवणात येणार .! ; मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – सीताराम गावडे यांचे आवाहन.

सावंतवाडी : तमाम मराठा समाजाचे नेते मराठा ऋदयसम्राट मनोज जरांगे पाटील दिनांक १ सप्टेंबर रोजी मालवण राजकोट येथे येऊन हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली अवस्था प्रत्यक्ष भेट देऊन १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता या नियोजित वेळेनुसार पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी १० वाजता मराठा समाज भुवन कुडाळ येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मराठा समाज बांधवांनी व छत्रपतींवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.

राजकोट मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घाईगडबडीत उभारण्यात आला. अगदी नवख्या शिल्पकाराला हा ठेका देण्यात आला हा ठेका देताना कोणाची मर्जी सांभाळण्यात आली,याचा शोध घेणे गरजेचे आहे,या सगळ्या घटनेचा आढावा घेण्यासाठी सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील १ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता मालवण राजकोट येथे येत आहेत त्यानंतर त्यांची मराठा समाज भवन कुडाळ येथे जाहिर सभा होणार आहे. तरी मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles