मंत्री नितेश राणे उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर!

कणकवली : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे गुरुवारी १४ रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर दौऱ्यावर येत आहेत.

नाम. नितेश राणे यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे.

बुधवार, १३ ऑगस्ट रोजी रात्रौ १०:४५ वा. मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईकडे प्रयाण, रात्रौ ११:०५ वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आगमन व २०१११ कोकण कन्या एक्सप्रेसने चिपळूण, जि. रत्नागिरीकडे प्रयाण.

गुरुवारी १४ ऑगस्ट रोजी सकाळी ०४.०० वा. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे आगमन व मोटारीने हॉटेल तेज ग्रँड, खेर्डी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरीकडे प्रयाण, सकाळी ०४.१० वा. हॉटेल तेज ग्रँड, खेर्डी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे आगमन व राखीव, सकाळी ०८.३० वा. आमचा देवा भाऊ या अभियानांतर्गत राख्यांचे संकलन ( हॉटेल तेज ग्रँड, खेर्डी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी ), सकाळी ०९.३० वा. मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण, सकाळी ११.०० वा. आमचा देवा भाऊ या अभियानांतर्गत राख्यांचे संकलन ( भाजपा कार्यालय रत्नागिरी ), दुपारी १२ वा. मोटारीने जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव, दुपारी ०२.३० वा. ओरोस, जि. सिंधुदुर्ग येथे अगामन व राखीव, दुपारी ०३.०० वा. विविध मागण्यांच्या अनुषंगाने उपोषणाची नोटीस दिलेल्या उपोषणकर्त्यांच्या भेटी व चर्चा ( ठिकाण : जिल्हा नियोजन समिती सभागृह, जि. सिंधुदुर्ग ), सायं. ०६.०० वा. स्वातंत्रदिनाच्या पूर्व संध्येस आयोजित तिरंगा रॅलीस उपस्थिती ( ठिकाण – छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पटवर्धन चौक, कणकवली, जि. सिंधुदुर्ग) असा त्यांचा नियोजित दौरा असल्याचे नाम. नितेश राणे यांच्या संपर्क कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles