Sunday, July 13, 2025

Buy now

spot_img

राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोंसले यांना जयंतीनिमित्त अनोखी मानवंदना .! ; नरेंद्र डोंगर येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

सावंतवाडी : सावंतवाडी संस्थानच्या राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोंसले यांच्या 89 व्या जयंतीचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोसले व युवराज्ञी सौ्. श्रद्धाराजे भोंसले यांनी नरेंद्र डोंगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्याचे ठरविले. त्यानुसार नरेंद्र डोंगर येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये वनविभाग सावंतवाडी, सावंतवाडी नगरपरिषद, रोटरी क्लब सावंतवाडी, लायन्स क्लब सावंतवाडी व इनरव्हील क्लब सावंतवाडी तसेच श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे एनसीसी व एनएसएस विभागाचे विद्यार्थी्थी, निवृत्त डी एफ ओ श्री रणजीत राणे, डीएफओ श्री सुभाष पुराणिक, संस्थेचे संचालक प्रा. डी टी देसाई सहसंचालक अॅड. शामराव सावंत, सदस्य श्री जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, रोटरी क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष श्री प्रमोद भागवत. सचिव श्री. शेलटकर, डॉ. विनय बाड, लायन्स क्लबचे श्री उसगांवकर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉ. सुमेधा धुरी, श्री गणपत शिरोडकर, वनविभागाचे श्री दत्ता पाटील ,श्री प्रमोद सावंत नगरपरिषद सावंतवाडी चे श्री फोंडेकर, महाविद्यालयाच्या एनएसएस व एन सी सी विभागाचे समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


श्री. पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोंसले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी कु. ऋषिकेश पाटील यांनी ब्रिटिश सरकारची साठ लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळवली याबद्दल त्याचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.त्यानंतर नरेंद्र डोंगर येथे वृक्षारोपण करण्यासाठी 300 लोक उपस्थित होते. नरेंद्र डोंगराचा पायथ्यापासून रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले.सर्व उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.जलवायू परिवर्तन, वातावरणातील बदल यावर उपाय म्हणून वृक्षारोपण हा एकमेव उपाय आपल्या हातात आहे असे युवराज लखमसावंत भोंसले यांनी सांगितले. राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोंसले यांना निसर्गाची खूप आवड होती. त्या उत्कृष्ट चित्रकार होत्या. त्यानी अनेक वन्यप्राणी, पक्षी फुलपाखरेे यांची कॅनव्हास वर चित्रे काढली होती.त्यांच्या या आवडीचा विचार करून नरेंद्र डोंगरावर भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचा आयोजन यानिमित्त करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्रा.डाॅ. जी. एस. मर्गज, एनएसएस विभागाचे डॉ. यु. सी. पाटील, डॉ. सुनयना जाधव, एनसीसी विभागाचे डॉ. सचिन देशमुख, डॉ. विशाल अपराध यांनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles