आजगाव ‘वाघबीळ’ येथील लोखंडी रेलिंग तुटल्याने अपघातास आमंत्रण! ; रस्त्याच्या कडेला खोल दरी, मोठी दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण?

सावंतवाडी : मळेवाड ते शिरोडा जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर “आजगाव वाघबीळ” येथे खोल दरी असून या वळणदार रस्त्याच्या कडेला अपघात होऊ नये म्हणून लोखंडी रेलिंग करण्यात आले आहे .मात्र या रेलिंग मधील काही भाग तुटून, या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे.त्यात करून या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी,रस्त्यावर आल्याने वाहन चालवणे मुश्किल बनले आहे.

“आजगाव वाघबीळ” येथे अपघात टाळण्यासाठी लावण्यात आलेले लोखंडी रेलिंग तुटल्याने एखादे वाहन बाजूला गेल्यास अपघात होण्याची दाट शक्यता आहे.त्यात करून या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे वाहनधारकांना हा तुटलेला भाग लक्षातच येत नाही,

आजगाव वाघबीळ येथे तुटलेल्या रेलिंग च्या खाली खोल दरी असून, या तुटलेल्या लोखंडी रेलिंग तसेच दुतर्फा वाढलेल्या झाडीबाबत तत्काळ बांधकाम विभागाने लक्ष घालून, पुढे होणारा संभाव्य धोका टाळावा,अशी मागणी वाहनचालक,ग्रामस्थ करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles