पत्रकार सीताराम गावडे यांच्या गळचेपीचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून जाहीर निषेध! ; जर पोलिसांनी प्रामाणिकपणे कामं पार पाडले असते तर ‘ही’ वेळ येणार नव्हती!

सिंधुदुर्ग: गेली पस्तीस वर्षे पत्रकारितेत प्रामाणिकपणे काम करणारे जेष्ठ पत्रकार तथा कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेलचे संपादक सिताराम गावडे यांच्याबाबत मालवण बीचवर अंमली पदार्थांचा सुळसुळाट नागरिकांत कुजबुज अशा आशयाची बातमी प्रसिद्ध केल्यावर काही व्यावसायिक एकत्र येत सत्य दाबण्याचा प्रयत्न करतात हे निषेधार्ह आहे.या प्रवृत्तीचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आबा खवणेकर व पत्रकार समिल जळवी यांनी जाहीर निषेध केला आहे.

वास्तविक या मागची सत्यता पडताळणे पोलिसांचे काम आहे ते सोडून एका जेष्ठ पत्रकाराला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करा अशी मागणी करने म्हणजे पत्रकाराची गळचेपी करून आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे,याचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष व उपाध्यक्ष या नात्याने आम्ही त्रीव शब्दात जाहिर निषेध करीत आहे.

सीताराम गावडे यांना फोन करुन त्यांच्यावर आरोप करून धमकी देऊन रेकाॅर्डिंग व्हायरल करून जेष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही जाहिर निषेध करीत आहे.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सीताराम गावडे यांच्या पाठीशी उभा आहे.याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी,व पोलीस अधीक्षक यांना देण्यात येणार आहे.

आबा खवणेकर जिल्हाध्यक्ष
समिल जळवी उपाध्यक्ष

(महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सिंधुदुर्ग/ मुंबई)

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles