सावंतवाडी : सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षात ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा -1 ‘ या अभियानामध्ये येथील मिलाग्रीस स्कूल सावंतवाडी या प्रशालेने सहभागी होऊन द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता. तर यावर्षी सन 2024 – 2025 शैक्षणिक वर्षात ‘ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा – 2 ‘ मध्ये मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला असून त्यांची जिल्हास्तरीय अभियानासाठी निवड झाली आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय नियुक्त समितीच्या परीक्षणानंतर शाळेची निवड जिल्हास्तरीय परीक्षणासाठी झाल्याचे समजते.
मिलाग्रीस हायस्कूल दरवर्षी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत असून विविध स्पर्धा परीक्षा , सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रामध्ये तालुकास्तर ते राष्ट्रीय स्तर अशाप्रकारे ही प्रशाला नावलौकिक प्राप्त करीत आली आहे. वर्षभर शालेय स्तरावर शालांतर्गत स्पर्धा व उपक्रमाचे यशस्वी आयोजन दरवर्षी प्रशालेत होत असून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा – 2 मध्ये मिळविलेले यश हे या सर्वांचे फलित असल्याची भावना प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदाना यांनी यावेळी व्यक्त केली. संस्थाध्यक्ष बिशप ऑल्विन बरॅटो तसेच अन्य संस्थाचालक यांनी या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालकांचे आभार व्यक्त करीत अभिनंदन केले. यावेळी वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना बोडके तसेच केंद्रप्रमुख श्री प्रमोद पावसकर व श्री कमलाकर ठाकूर यांचे मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी आभार व्यक्त केले.
ADVT
–