‘ती’ महाकाय मगर अखेर वनविभागाच्या पथकाने केली जेरबंद ! ; वेत्ये येथील ग्रामस्थांनी घेतला सुटकेचा निःश्वास!

सावंतवाडी : तालुक्यातील वेत्ये येथील कलेश्वर मंदिरालगत ओहोळात गेले काही दिवस वास्तव्य करून असलेल्या सुमारे १२ फूटी महाकाय मगरीला आज अखेर वनविभागाच्या जलद कृती दलाच्या पथकाने जेरबंद केले. या मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

गेले काही दिवस ही महाकाय व अत्यंत धोकादायक मगर या परिसरात फिरताना दिसून येत होती. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या मगरीचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी स्थानिकांकडून वनविभागाकडे करण्यात आली होती.

त्यानंतर आज रविवारी सायंकाळी ४ च्या सुमारास अखेर वनविभागाच्या जलद कृती दलाचे प्रमुख बबन रेडकर यांच्यासह जवान शुभम कळसुलकर, आनंद राणे, प्रथमेश गावडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मोठ्या शिताफीने सदर मगरीला जेरबंद केले. यावेळी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, जितेंद्र गांवकर, बाळू गांवकर, बाळू गावडे आदींसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles