‘मेक ईन कोकण’ अंतर्गत उद्योग, व्यवसाय, रोजगार महोत्सव २०२५ चा शानदार शुभारंभ!

सावंतवाडी :  भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मेक ईन कोकण’ या उपक्रमाला चालना देण्यासाठी “उद्योग, व्यवसाय, रोजगार महोत्सव २०२५” अंतर्गत बचतगटांच्या उत्पादनापासून सर्व क्षेत्रातील कोकणवासीय उद्योजकांच्या उत्पादनांना लोकाभिमुख करणारे भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाचा प्रारंभ पद्मश्री मा. परशुराम गंगावणे सर यांच्या शुभ हस्ते फीत कापून मोठ्या उत्साहात झाला‌.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेनुसार, बेरोजगारांना व्यवसायिक दिशा देण्यासाठी आणि स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशानाने या ‘उद्योग, व्यवसाय, रोजगार महोत्सव २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे.

सामाजिक बांधिलकी मानून वाढदिवसाच्या निमित्ताने समाजसेवेला प्राधान्य देताना कोकणाला ‘आत्मनिर्भर’ बनवण्याचा निर्धार भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी करुन “मेक ईन कोकण” या अभियानाला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाद्वारे केला आहे.

या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी सावंतवाडी मंडल अध्यक्ष श्री. सुधीर आडीवरेकर, महिला मंडळ अध्यक्षा सौ. मोहिनी मडगावकर, मा. नगरसेविका सौ. दीपाली भालेकर, युवा मोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, सरचिटणीस दिलीप भालेकर, सोशल मिडिया प्रमुख केतन आजगावकर, चिटणीस धीरेंद्र म्हापसेकर, शक्ती केंद्र प्रमुख अमित गवंडळकर, बूथ अध्यक्ष विजू साटेलकर, रंगनाथ गवस, शिरीष नाईक, सुकन्या टोपले, नयना सावंत, मेघना साळगावकर, अनुषा मेस्त्री, ज्योती मुद्राले व सावंतवाडीतील नागरिक, उद्योजक, युवा, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles