विद्याधर पाटणकर यांची पतंजली योग समिती सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी पदी नियुक्ती.

सावंतवाडी : परमपूजनीय स्वामी रामदेव महाराज यांच्या आशीर्वादाने पतंजली भारत स्वाभिमान न्यास महाराष्ट्र पश्चिमचे राज्य प्रभारी बापूजी पाडळकर व पतंजली योग समिती महाराष्ट्र पश्चिम राज्य प्रभारी चंद्रशेखरजी खापणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नवनियुक्ती केली आहे. पतंजली योग समिती, सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारीपदी(अध्यक्षपदी) विद्याधर पाटणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच इतरही पदाधिकाऱ्यांची नवनियुक्ती करण्यात आली असून यात,पतंजली योग समिती- सिंधुदुर्ग जिल्हा सहप्रभारीपदी दत्तात्रय निखार्गे तर पतंजली सोशल मीडिया जिल्हा प्रभारीपदी योगेश येरम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे भारत स्वाभिमान न्यास सहजिल्हा प्रभारी म्हणून रावजी परब , जिल्हा महामंत्री म्हणून विकास केरकर तर जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून लक्ष्मण पावसकर यांची निवड करण्यात आली आहे.
नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे भारत स्वाभिमान न्यास (महाराष्ट्र पश्चिम) राज्य प्रभारी बापूजी पाडळकर, पतंजली योग समिती राज्य प्रभारी चंद्रशेखरजी खापणे, भारत स्वाभिमान न्यास जिल्हा प्रभारी डॉ. तुळशीराम रावराणे तसेच जिल्ह्यातील योगशिक्षक, योगसाधक आणि हितचिंतकांनी अभिनंदन केले आहे.
नवनियुक्त जिल्हा प्रभारी विद्याधर पाटणकर म्हणाले की, वरिष्ठांच्या सुचनेनूसार आणि जिल्ह्यातील सर्वांच्या सहकार्याने आपली या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल आपण सर्वांचा आभारी आहे.तसेच सर्वाना सोबत घेऊनच आणि सर्वांच्या सहकार्याने परमपूजनीय स्वामीजींचे हे संघटन कार्य वृद्धिंगत करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहीन. तसेच वरिष्ठांच्या सूचनेनूसार आणि परवानगीने लवकरच तालुका कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles