दोडामार्ग : माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी दोडामार्ग शहरासहित तालुक्यात दौरा करत गणरायांचे दर्शन घेतले यामुळे समर्थकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले.
माजी आमदार उपरकर यांनी समर्थकांसहित कार्यकर्ते हितचिंतक व पत्रकार यांच्या घरी जात गणरायांचे दर्शन घेतले. यावेळी जीजी उपरकर समर्थक आशिष सुभेदार, बाळा बहिरे, नाना सावंत, आदेश सावंत, अभय देसाई, विनायक सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.