सावंतवाडी : अनेक वर्षे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. यामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे, अशी सर्वांची श्री. देव पाटेकर चरणी प्रार्थना होती. गोरगरीब जनतेसाठी राजघराणे यांनी सावंतवाडीतील जनतेला ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आरोग्य सेवा मिळावी, यासाठी रुग्णालयात असलेली तीन एकर जमीन पैकी दीड एकर जमीन जुन्या रुग्णालयासमोरील ही जागा मोफत देण्यात आली असून श्रीमंत खेमराज सावंत भोसले यांच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी मार्फत सह्या करून मोफत जमीन देण्यात आली असून राज घराण्याची युवराज्ञी श्रद्धाराजे सावंत – भोंसले यांची लवकरच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कागदपत्रांवर ती सही देऊन हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. राज घराण्याचे शतशः सावंतवाडी जनता ऋणी असून यासाठी जनता आता राजघराण्याचे विशेष आभार मानले आहेत, अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली आहे.
आजपर्यंत सावंतवाडी मध्ये राजघराण्याने जनतेच्या हितासाठी व सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सावंतवाडी शहरातील अनेक जमिनी मोफत दिल्या असून याची सविस्तर माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी, यासाठी राजू मसुरकर यांनी माहिती दिली आहे.
सावंतवाडीतील खेळाडूंना जिमखाना येथील जागा, त्याचप्रमाणे एसटी स्टँड बस स्थानकाची जागा , उभा बाजार रघुनाथ मार्केटची जागा, श्रीराम वाचन मंदिरची जागा, आरपीडी शाळेची जागा, पूर्वीच्या काळी जिल्ह्यात कुठलेही कॉलेज नसताना तसेच पंचम खेमराज कॉलेजची जागा मोती तलावाशेजारील असलेले गार्डनची जागा तसेच असलेले बाजूला हॉटेल ची जागा सावंतवाडी ची रेस्ट हाऊस ची जागा सावंतवाडीतील बापुसाहेब महाराज पुतळ्या नजीक असलेली न्यायालयाची जागा जिल्हा न्यायालय पूर्वी असलेली रेस्ट हाऊसच्या समोरील जागा जुने रुग्णालय हे बापूसाहेब महाराज यांच्या काळामध्ये तसेच सुतिका गृह रुग्णालयाची जागा व रुग्णालयाची इमारत सावंतवाडीतील भाजी मार्केटची जागा नगरपालिका उभारलेली असलेली जागा तसेच शिल्पग्रामची जागा असे अनेक जागा सावंतवाडीच्या जनतेला असलेले उपयोगी जागा मोफत दिल्या असून हा त्याग राजघराण्याने केला आहे.
आज कालच्या तरुण पिढी जनतेला याची माहिती नसून एवढे उपकार सावंतवाडीतील जनतेला राजघराण्यानी दिला असून याची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी माहिती दिली आहे.
त्याचप्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नातेसंबंध राजघराण्याशी असल्याने खाजगी भेटीसाठी 2013 नोव्हेंबरपूर्वी सावंतवाडी राजवाडामध्ये राणी साहेब श्रीमती सत्वशीला देवी भोसले यांना भेटण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले असताना जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी 2011 ते 2012 या साली महाराष्ट्रातील 36 जिल्हे यापैकी आठ जिल्ह्यांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना दीड लाख रुपये कुटुंबीयांना मिळत होती, त्यामध्ये औषधे व शस्त्रक्रिया मोफत खाजगी रुग्णालयाला देण्यात आली होती.
परंतु महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली पुणे इत्यादी 28 जिल्हे या आरोग्य योजनेपासुन वंचित होते यासाठी मसुरकर यांनी निवेदन देऊन मागणी केली होती ती केवळ एक महिन्यामध्ये 2013 नोव्हेंबर नंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोग्य योजना मंजूर करण्यात आली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील 14 कोटी पैकी 12 कोटी जनतेला यामुळे आरोग्य योजना राजघराण्याच्या कृपाशीर्वादाने मंजूर झाली त्यानंतर 2017 साली सरकार बदलल्यानंतर त्या आरोग्य योजनेची नाव महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजना असे नामकरण करण्यात आले.
तसेच गोवा बांबुळी सुमारे नऊ वर्षांपूर्वी ही महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजना चालू नव्हती त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा व महाराष्ट्रातील जनतेला गोवा बांबूळी येथे शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसे मोजावे लागत होते यासाठी जनआक्रोश आंदोलन दोडामार्गच्या नागरिकांनी पंधरा दिवस चालू असताना राजू मसूरकर यांनी त्या आंदोलनाला भेट देऊन गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे हे राजघराण्याशी त्यांचे नातेसंबंध असल्याने आरोग्य मंत्र्यांशी राजू मसुरकर यांनी मोबाईल वरती बोलून ही महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजना राजघराणे व गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या नातेसंबंधामुळे राजू मसूरकर यांच्या प्रयत्नातून योजना गोरगरीब जनतेसाठी मोफत मंजूर गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी मोफत आरोग्य योजना मंजूर करण्यात आली.
यासाठी राजघराण्याचे जनतेवरती प्रेम व उपकार असल्याने श्री पाटेकर राजघराण्याला उदंड आयुष्य तसेच कृपा आशीर्वाद त्यांना मिळू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना सावंतवाडीच्या जनतेच्या वतीने श्री राजू मसुरकर जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी व्यक्त केले आहे