सावंतवाडी : तालुक्यातील रोनापाल गावामध्ये भरलवाडी येथे डेंग्यू सदृश्य महिला रुग्ण सावंतवाडीत उपचार घेत असून यासाठी सावंतवाडी व जिल्ह्यातील नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज आहे. आपल्याला, आपल्या नातेवाईकांना व आपल्या परिसरातील नागरिकांना डेंग्यू रुग्ण न होण्यासाठी आपल्या जवळपास घाणीचे पाण्याचे डबके असल्यास त्यामधील पाणी बाजूला करून त्यामध्ये बीचिंग पावडर त्याचप्रमाणे जळके ऑईल टाकल्यास डेंग्यूची पैदास होत नाही व डबके साचू नये, याची काळजी घ्यावी.
त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचा रुग्णाला एकशे एकच्या पुढे ताप असल्यास डोके व अंग थंड पाण्याने पुसून तसेच डोक्यावरती कपाळपट्टीवरती पाण्याची थंड कपड्याची घडी ठेवण्यात यावी. असे न केल्यास तीन ते चार ताप झाल्यास मेंदूमध्ये ताप चढून मेंदूमध्ये गुठळी तयार होऊन रुग्ण गंभीर होतो. अनेकदा रुग्णालयात असे रुग्ण येत असतात आणि त्यामध्ये सुद्धा बरेच वेळा गंभीर होऊन काही वेळा रुग्ण दगावलेले मी पाहिलेले आहे त्यानंतर रुग्णांची नातेवाईक डॉक्टरांना जबाबदार धरतात आणि भांडणे करतात असे होऊ नये म्हणून सर्व नागरिकांनी काळजी घेऊन याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी, अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसूरकर यांनी माहिती दिलेली आहे
डेंग्यू हा त्याची पैदात हे घाण पाण्याचे डबके त्याचप्रमाणे फुल झाडाच्या कुंड्यामध्ये साचलेले पाणी टायर मध्ये साचलेले पाणी असलेले अशामध्ये पैदास डेंगूची होत असते आजूबाजूच्या परिसरामध्ये असे घाणीचे साम्राज्य असल्यास आपल्या रुग्णांना डेंगूसदृश्य ताप येतो यासाठी कुठल्या प्रकारचा ताप आल्यानंतर तीन दिवस ताप न थांबल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्त चाचणी करण्यात यावी
यामध्ये प्लेटलेट साडेचार लाखाहुन कमी असल्यास डेंगू मलेरिया टायफड कावीळ अशा रक्त चाचण्या करून घेतल्यानंतर वेगवेगळ्या तापावरती वेगवेगळी औषधे व इंजेक्शनने अशा आजारांवरती असतात यासाठी तीन दिवसाहून अधिक ताप असल्यास लगेच डॉक्टरांनी रक्त चाचणी न सांगितल्यास आपण स्वतःहून रक्त चाचणी करून घेण्यात यावी असे रुग्ण घरच्या घरी सात आठ दिवस ताप अंगावरती काढल्यानंतर रुग्ण गंभीर होतो यानंतर फॅमिली डॉक्टर असे रुग्णाला डेंगू मलेरिया व टायफड ताप झाल्यानंतर शासकीय रुग्णालयामध्ये पाठवतात आणि प्लेटलेट ५०००० पेक्षा कमी झाल्यास या रुग्णाला तोंडा नाकातून रक्तस्त्राव होतो आणि असे रुग्ण गंभीर होत असतात.
यासाठी पुढील उपचारासाठी गोवा बांबुळी येते या रुग्णाला पाठवले जाते असे रुग्ण शासकीय रूग्णालयात आल्यास रुग्ण कॉट वरती झोपून उपचार घेत असतो व नातेवाईक कोट्याच्या खाली विश्रांती घेत असतो यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी काळजी घेणे गरजेचे आहे
आपण गणेश उत्सवात हजारो रुपयांचे फटाके फोडत असतो यामध्ये पैशांची उधळपट्टी होत असते त्यातील 25% पैसे आपण आपल्या परिसरामध्ये साफसफाई करण्यासाठी वापरल्यास आपल्या घरातील रुग्णाला या गंभीर आजारातून मुक्तता मिळू शकते त्याचप्रमाणे मलेरिया हा ताप आजूबाजूला घराच्या परिसरामध्ये झाडी वाढलेली असल्यास त्यामध्ये मच्छर पैदास होऊन सायंकाळी यावेळी आपल्या घरामध्ये येऊन चावा घेतल्यानंतर आपल्याला मलेरिया होतो टायफड हा आजार पाण्यापासून होत असतो
हे पाणी दूषित असल्यास त्यामध्ये दरवर्षी एक शेर जाडे मीठ तुरटी अर्धा किलो त्याच प्रमाणे ग्रामपंचायत व नगरपालिकेमध्ये विहिरत टाकण्यासाठी औषध किंवा क्लोरीन पावडर मेडिकल स्टोर मध्ये मिळते ती टाकल्यास टायफड ताप तसेच कावीळ ताप त्याचप्रमाणे सतत जुलाब होणे हे दूषित पाण्यामुळे होत असते जर चार ते पाच वर्षांनी विहिरीचा उसपा (गाळ)केल्यास व पाऊस येण्यापूर्वी व पाऊस गेल्यानंतर अशा प्रकारचे मीठ तुरटी व क्लोरीन पावडर विहिरीमध्ये टाकल्यास अशा प्रकारचे आजार आपल्याला होणार नाही याची काळजी घेण्यात यावी परंतु आजकालच्या तरुण पिढीला मोबाईलच्या जीवनामध्ये हे सर्व गोष्टी विसरले असून त्या काळातील वयस्कर व अशिक्षित व्यक्ती अशा प्रकारची काळजी घेत असल्याने रुग्णालयात रुग्ण दिसत नव्हते.
परंतु आजकालची सुशिक्षित व सुसंस्कृत नागरिक अशा प्रकारची काळजी न घेतल्यामुळे रुग्णालयात दिसत असतात. अशा गोष्टी रुग्णालयात आजारासाठी न यायचे असल्यास आपण वेळीच काळजी घ्यावी, अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी दिली आहे.