- ✍️ रुपेश पाटील.
- सावंतवाडी : निवडणुकीची रणधुमाळी आता दिवसेंदिवस रंगू लागली आहे. सावंतवाडी शहर आणि तालुक्यात सध्या महायुतीबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच लोकांना आता आपल्या पक्षात आणण्यासाठी प्रत्येक नेता आपापली रणनीती आखत आहे. या सर्वात आघाडीवर दिसत आहेत ते शिवसेनेचे बेधडक व दमदार नेतृत्व करणारे सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद परब उर्फ संजू परब. आपले नेते व माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी संजू परब यांना स्वातंत्र्य दिल्यामुळे आता संजू परब यांची राजकीय रणनीती दिवसेंदिवस आपले रंग दाखवू लागली आहे.
- रविवारी रात्री सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले गावातील शेकडो ग्रामस्थ, विविध पक्षांचे पदाधिकारी व युवा वर्ग तसेच महिलावर्ग यांनीही आपले नेते हे फक्त ‘दीपक केसरकरच!’ असे ठामपणे सांगत जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाला मान्य करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी आमदार दीपक केसरकर व जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पक्षप्रवेश केलेल्या तमाम ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांचे शिवसेना शिंदे गटात सामील झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करून त्यांचे स्वागतही केले.
- दरम्यान यावेळी व्यासपीठावर आमदार दीपक केसरकर, जिल्हाध्यक्ष संजू परब, तालुका प्रमुख दिनेश गावडे, सावंतवाडी विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, जिल्हा बँकेचे संचालक विद्याधर परब, गजानन नाटेकर, प्रमुख गावकर सोमनाथ रामचंद्र राऊळ, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, माजी जिल्हाध्यक्ष अशोक देसाई, युवा नेते सूरज परब, उपतालुकाप्रमुख राकेश पवार यांसह शिवसेनेचे विविध पदाधिकारी व गावातील ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते.
- दरम्यान यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रमुख गावकर श्री सोमनाथ रामचंद्र राऊळ, श्री बाबी राऊळ, बाळू गावडे आदींनी केले.

- यावेळी आ. दीपक केसरकर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, वेर्ले गावासाठी आजपर्यंत ज्या काही मागण्या झाल्या त्या अधिकाधिक पूर्ण केलेल्या आहेत. आगामी काळातही गावात हायमास्ट तसेच रस्त्याची कामे व इतर रखडलेली कामे देखील पूर्णत्वास नेण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार केसरकर यांनी नमूद केले.

- जिल्हाप्रमुख संजू परब यांनी प्रवेश केलेल्या सर्वांचे पक्षात स्वागत केले तसेच आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आपण पाठपुरावा करून वेर्ले पंचक्रोशीच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी शासन दरबारी व प्रशासनाच्या दरबारी पाठपुरावा करत गावासाठी जे जे सहकार्य आहे ते शंभर टक्के करण्याची ग्वाही देत आपण सर्वांनी आमदार केसरकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त शिक्षक भरत गावडे यांनी केले.
- ‘ह्यांनी’ केला शिंदे सेनेत पक्षप्रवेश –
वेर्ले गावातील युवा नेतृत्व वेर्ले ग्रामपंचायत सदस्य सूरज बाळकृष्ण राऊळ, युवा नेतृत्व तरुणांचे आवडते नेतृत्व वेर्ले ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण काशिराम गावडे, वेर्ले विवीध विकास सेवा संस्था अध्यक्ष व माजी सरपंच विजय गंगाराम राऊळ, माजी सरपंच, माजी देवस्थान उपसमीती उपाध्यक्ष, सावंतवाडी तालुका काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष चद्रकांत सखाराम राणे, माजी सरपंच, माजी देवस्थान उपसमिती अध्यक्ष यशवंत अर्जुन राऊळ, माजी सरपंच पंढरी लक्ष्मण राऊळ, माजी उपसरपंच शशिकांत घाडी, माजी ग्रामपंचायत सदस्य व विद्यमान सोसायटी चेअरमन अनिल विष्णू लिंगवत, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश फटू राऊळ, उबाठा माजी शाखाप्रमुख संजय भगवान राऊळ, प्रमुख गावकार सोमनाथ रामचंद्र राऊळ, माजी ग्रामपंचायत सदस्य सौ. अस्मिता चंद्रकात राणे, सामाजिक कार्यकर्ते सुनील नारायण मर्गज, रामा लक्ष्मण राणे, माजी सोसायटी संचालक अर्जुन रामचंद्र मोरजकर, सामाजिक कार्यकर्ते आदित्य अजीत राऊळ, तुकाराम वसंत राऊळ, प्रमुख ग्रामस्थ विश्राम पुंडलिक लिंगवत, पाडुरंग बापू राऊळ, गुणाजी साबा राऊळ, शांताराम राऊळ (टेमकर), सत्यवान सिताराम राऊळ, अशोक य,शवंत राऊळ, बुधाजी विश्राम घोगळे, पीडजी सखाराम राऊळ, संतोष पाडुरंग लिंगवत, सुनील सोमा राऊळ, रामकृष्ण पुंडलिक राऊळ, नारायण सखाराम राऊळ, अजीत शांताराम राऊळ, न्हानु अर्जुन बांदेकर, अर्जुन रामा सावंत, सत्यवान रामा सावंत, प्रकाश लिंगो घाडी, संजय राघो घाडी, महादेव कृष्णा मोरजकर, सहदेव तुकाराम राऊळ, कृष्णा तुकाराम राऊळ, गुडु महादेव राऊळ, प्रकाश फटु राऊळ, चद्रकांत शंकर राऊळ, अनंत बाबू राऊळ, वासुदेव भिकाजी राऊळ, मधुकर महादेव राऊळ, सहदेव भीवा राऊळ यांसह अनेकांचा समावेश आहे.





