सावंतवाडी : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा तेरावा स्मृतिदिन सावंतवाडी येथील मध्यवर्ती शिवसेना कार्यालयामध्ये साजरा करण्यात आला यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी निशांत तोरस्कर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जय भवानी जय शिवाजी अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे शिवसेना जिंदाबादच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या
यावेळी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सीमा मठकर यांच्यासह उमेदवार निशांत तोरस्कर उमेश कोरगावकर शहर प्रमुख आणि उमेदवार शैलेश गवंडळकर समीरा खलील आर्या सुभेदार श्रुतिका दळवी तसेच माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर शब्बीर मणियार आशिष सुभेदार आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर राजू कासकर यांच्यासह तालुकाध्यक्ष श्री सावंत यांचीही उपस्थिती होती.
यावेळी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.



