सावंतवाडीच्या प्रभाग १ मध्ये भाजपच्या प्रचाराला वेग! ; युवराज लखमराजेंच्या हस्ते दिपाली भालेकर, राजू बेग यांच्या प्रचाराचा शुभारंभ!

​सावंतवाडी,: भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्र. १ चे उमेदवार दिपाली भालेकर आणि राजू बेग यांनी आज भटवाडी येथील विठ्ठल मंदिर आणि दत्त मंदिर येथे श्रीफळ ठेवून आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला.

​या प्रचाराचा शुभारंभ युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना उमेदवार दिपाली भालेकर म्हणाल्या, “माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवून काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची आभारी आहे. नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरून, प्रभागातील प्रलंबित कामे आणि समस्या सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. यापूर्वीप्रमाणेच आपण सर्वांनी पुन्हा एकदा आशीर्वाद आणि सहकार्य करावे.​यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी, भाजप सरचिटणीस दिलीप भालेकर, बुथ अध्यक्ष रवींद्र नाईक, प्रमोद भागवत, बाबी गवस यांच्यासह परशुराम गावडे, राजू सुभेदार, प्रसाद कशाळीकर, गुंडू कदम, नीलम जोशी, पूजा कशाळीकर, बंडया केरकर, रफिक जामदार, झेबा जामदार, स्नेहल जाधव, गीता रेगर, देऊ गावडे, शितल मिस्त्री, श्री गावडे, प्रदीप भालेकर, संतोष खंदारे, नंदू अळवणी, शशिकला अळवणी, देठे सर, पवार सर, निकिता पेडणेकर, सुजाता कोदे, समीक्षा खोचरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles