…. तरचं आपले सर्व उमेदवार येतील निवडून! : भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा मौलिक मंत्र. ; वेंगुर्ले भाजप प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, उमेदवारांशी चर्चा करून घेतला प्रचाराचा आढावा.

वेंगुर्ले : भाजपचे सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवार यांनी एकदिलाने प्रचारात उतरून काम करा. अफवांवर विश्वास ठेवू नका. भाजपने केलेले काम नागरिकांपर्यंत पोहोचवा असे आवाहन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वेंगुर्ले येथे केले. वेंगुर्ले भाजप प्रचार कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपातर्फे उभे असलेल्या सर्व उमेदवारांशी चर्चा करून प्रचाराचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, युवा नेते विशाल परब, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न देसाई, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप उर्फ राजन गिरप, साईप्रसाद नाईक, जयंत मोंडकर, तालुका सरचिटणीस वसंत तांडेल, महिला जिल्हा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गावडे,
नगरसेवक पदाचे उमेदवार मंजुषा महेंद्र आरोलकर, रवी रमाकांत शिरसाठ, गौरी गणेश माईनकर, प्रीतम रमाकांत सावंत, विनायक सदानंद गवंडळकर, गौरी मराठे, आकांक्षा आनंद परब, तातोबा उर्फ सुधीर महादेव पालयेकर, सुषमा सूर्यकांत प्रभूखानोलकर, विनय अशोक नेरूरकर, रिया वासुदेव केरकर, सदानंद तुळशीदास गिरप, काजल किरण गिरप, सचिन भगवान शेट्ये, श्रेया शैलेश मयेकर, प्रसाद विनायक गुरव, युवराज लक्ष्मण जाधव, यशस्वी योगेश नाईक, प्रणव बाबली वायंगणकर, शीतल द्यानेश्वर आंगचेकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles