आ. केसरकर प्रचारात झाले Active! ; होम ग्राऊंडवर प्रचाराला जोरदार सुरुवात.

सावंतवाडी : माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर अखेर आपल्या होमपीचवर उतरले आहे. युतीच्या चर्चा सुरू असल्याने शांततेत असलेले केसरकर आता ॲक्टीव्ह मोडवर आलेत. विरोधकांच आव्हान स्वीकारत त्यांनी प्रभागात जात आपल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी प्रारंभ केला आहे‌.

श्री. केसरकर यांनी आपलं होमग्राउंड पिंजून काढायला सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. निता सावंत-कविटकर यांच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी कॉर्नर सभा घेण्यास सुरुवात केली आहे. प्रभाग ६ व प्रभाग ८ मध्ये दुर्गेश उर्फ देव्या सुर्याजी, शर्वरी धारगळकर, माजी नगराध्यक्षा अनारोजिन लोबो, सुरेंद्र बांदेकर यांच्या प्रचारास ते उपस्थित होते. शहरालतील इतर भागातही त्यांनी आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. याप्रसंगी शिवसेनेच्या महिला शहरप्रमुख भारती मोरे, क्लेटस फर्नांडिस, साक्षी गवस, श्री. डिसोझा आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles