प्रभाग ९ मध्ये उबाठाच्या क्षिप्रा सावंत यांचा घरोघरी प्रचार! ; नगराध्यक्ष पदासाठी सीमा मठकरांना जनतेचा प्रतिसाद!

सावंतवाडी : नगरपरिषद निवडणूक आता चांगली रंगात आली आहे. आज प्रभाग ९ मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या उमेदवार क्षिप्रा सावंत यांच्या सोबतीला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सीमा मटकर यांनी दारोदारी जाऊन मतदारांना मतदान करण्यासाठी विनंती केली. दरम्यान प्रभाग नऊ मध्ये ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवार सौ. सावंत आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सीमा मठकर यांना मतदारांनी हसतमुखपणे स्वागत करून त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. आपला विजय पक्का असल्याची खात्री दोन्हीही उमेदवारांनी यावेळी ‘सत्यार्थ’जवळ व्यक्त केली. दरम्यान स्वर्गीय आमदार जयानंद मठकर यांची पुण्याई आणि सावंतवाडीकरांचे आशीर्वाद यामुळे आपला नक्की विजय होणार!, असा आशावाद सीमा मिलिंद मठकर यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles