सावंतवाडी : येथील नगरपरिषद निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या उमेदवारांना नक्कीच यश मिळणार असून आमच्या लाडक्या भगिनी सौ. सीमाताई मठकर नक्कीच नगराध्यक्षपदी विराजमान होतील, असा आशावाद माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
आज सावंतवाडी येथे सौ. सीमा मिलिंद मठकर यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.
दरम्यान त्यांनी माजी मंत्री प्रवीण भोसले यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सावंतवाडी विधानसभा क्षेत्राचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सीमा मठकर, सागर नानोसकर, मनसेचे मिलिंद सावंत यांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक उपस्थित होते.



