सावंतवाडी: शहरातील संतोष प्रभाकर नेमळेकर (वय 48, राहणार माठेवाडा सावंतवाडी ) हे सृष्टी बिल्डिंग समोर पत्र्याच्या शेडच्या बाजूला गोवा बनवायचा 27 दारूच्या बॉटल सुमारे 12 हजार रुपये किमतीच्या आपल्या ताब्यात विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला मिळून आला म्हणून त्याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (२५/११ रात्री अकरा वाजता) सदर कारवाई एपीआय जयेश खंदरकर, पोलीस हवालदार शिंगाडे आदींनी यांनी केली.



