ठाकरेंच्या सीमा मठकरांसाठी डॅशिंग आ. महेश सावंत मैदानात! ; जोरदार शक्तिप्रदर्शन, रॅलीने वेधले लक्ष!

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद निवडणूकीच्या अनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. बाजारपेठेतून सर्व उमेदवारांच्या उपस्थित रॅली काढण्यात आली. आमदार महेश सावंत यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.

आमदार सावंत म्हणाले, धनशक्तीचा कितीही वापर झाला तरी जनशक्ती आमच्या सोबत आहे‌. आमच्या उमेदवाराला जनता साथ देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सीमा मठकर व विधानसभा मतदारसंघ प्रमुख रूपेश राऊळ यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. यावेळी उमेदवार निशांत तोरसकर, शैलेश गवंडळकर, देवा टेमकर, क्षीप्रा सावंत, अफरोज राजगुरू, समिरा खलिल, शेखर सुभेदार, उमेश कोरगावकर, कृतिका कोरगावकर, चंद्रकांत कासार, सामाजिक कार्यकर्ते रमेश बोंद्रे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles