‘त्या’ गोळीबार प्रकरणातील सचिन मर्गजच्या मृत्यूला नेमकं कोण कारणीभूत? ; ग्रामस्थांकडून सखोल चौकशीची मागणी, सावंतवाडी पोलीस निरीक्षकांकडे निवेदन सादर

सावंतवाडी : तालुक्यातील वेर्ले गावात बंदुकीच्या गोळीत मृत्यूमुखी पडलेल्या सचिन मर्गज यांच्या मृत्यू मागे सुप्रियान डान्टस याच्यासह आणखी काही जणांचा समावेश आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणी जर योग्य न्याय मिळाला नाही, तर आंदोलन करू तसेच, झालेल्या प्रकाराबाबत पोलीस निरीक्षक यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती जनतेला द्यावी असे ही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान वेर्ले, शिरशिंगे, कलंबिस्त, ओवळीये, सांगेली आदी सह्याद्री पट्ट्यातील गावांमध्ये स्थानिक तरुणांना हाताशी धरून बाहेरील शिकारी लोक येतात आणि असे अनैतिक प्रकार घडतात याची ही चौकशी करण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांना देण्यात आले आहे

त्यात असे म्हटले आहे की, सचिन मर्गज हा शेतकरी कुटुंबातील एकुलता एक होते. त्यांचे वडील सुभाष मर्गज हे मोलमजुरी करून उपजिविका करतात. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. या प्रकरणात सुप्रियन डांटस यांच्यासह अजून काही लोकांचा हात असण्याची शक्यता पीडित कुटुंबाने वर्तवली आहे. झालेला प्रकार संशयास्पद असून, यावर राजकीय दबाव वापरला जात असल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. त्यामुळे, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles