मेरा युवा भारत सिंधुदुर्ग, व कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन.

सावंतवाडी : मेरा युवा भारत सिंधुदुर्ग, (युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार) व कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेचे भव्य आयोजन जयप्रकाश नारायण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाडोस हायस्कूलच्या मैदानावर उत्साहात पार पडले.या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेचे उद्घाटन वाडोस हायस्कूलचे शिक्षक डॉ. श्री. आनंद राठ्ये, कोकण संस्था समन्वयक गौरी आडेलकर, शिक्षक विठोबा कडव, श्री. हर्षद धुरी, श्रीम.दीक्षा म्हाडगुत, श्रीम. श्रेया पवार, श्री. सिताराम जाधव (क्रीडा प्रशिक्षक), श्रीम. हिमाली सावंत, श्रीम. शिल्पा कडव, श्रीम. आराध्या भिसे आणि श्री. विजय चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उत्तम क्रीडा संस्कार, शिस्त, संघभावना आणि निरोगी स्पर्धेचे महत्त्व बाबत मार्गदर्शन केले. मुलासाठी कबड्डी स्पर्धा, १०० मी. धावणे, गोळा फेक तर मुलींसाठी खोखो, १०० मी. धावणे, गोळा फेक अशा क्रीडा प्रकाराचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत मोठ्या संख्येने महिला व पुरुष संघांनी व खेळाडूंनी सहभाग नोंदवला. धावपटू स्पर्धा, गोळाफेक, खो-खो, कबड्डी अशा विविध क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजयी खेळाडूंना भारत सरकारच्या खेल मंत्रालयाचे प्रमाणपत्र व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दिवसभर चाललेल्या स्पर्धेत खेळाडूवृत्ती आणि कौशल्याचे उत्तम प्रदर्शन पाहायला मिळाले. उत्कृष्ट खेळाडू व विजेत्या संघांचा पारितोषिक वितरण सोहळ्यात गौरव करण्यात आला.
या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळून क्रीडा संस्कृतीला नवी दिशा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोकण कला व शिक्षण विकास संस्था इंडिया समन्वयक श्रीम.गौरी आडेलकर यांनी केले तर श्रीम.रूचा पेडणेकर यांनी आभार मानले.क्रीडा महोत्सव यशस्वी होण्यासाठी कोकण संस्थेचे वैष्णवी म्हाडगुत व अन्य सहकारी यांचे सहकार्य लाभले. प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, यांनी मैदान व्यवस्था व इतर अयोजांसाठी मदत केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles