जनाची नाही तर मनाची तरी बाळगा!, बांधकाम विभाग व ठेकेदाराला धरले ग्रामस्थांनी धारेवर! ; मळेवाड – आजगाव रस्त्यावर पुन्हा अपघात, ग्रामस्थ संतप्त.

सावंतवाडी: मागील काही महीन्यापूर्वी मळेवाड ते आजगाव सावरदेव व मळेवाड जकात नाका येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते मात्र काही दिवसातच या रस्त्यावरील डांबरीकरण खराब होऊन रस्त्यावर खड्डे पडले.मात्र हे खड्डे अजूनही बुजवले नाहीत त्यामुळे येथे वाहने घसरून अपघात घडत आहेत.वारंवार अपघात घडूनही संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असून याचा त्रास मात्र वाहन धारकांना होत आहे. आज सायंकाळीं असाच दुचाकीस्वार छोट्या मुलीसह जात असताना गाडी खड्ड्यातील पसरलेल्या खडीवर घसरून पडली.

वारंवार असे अपघात घडत असून सुद्धा रस्त्यावरील खड्यांबाबत, पसरलेल्या खडी बाबत संबंधित विभाग,ठेकदार लक्ष देत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.तत्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles