संजू परब परिणामांची चिंता करीत नाही! ; वेंगुर्ला पदाधिकार्‍यांच्या राजीनामा सत्रावर शिवसेना जिल्हाप्रमुख स्पष्टचं बोलले. ; शिवसेनेची वेंगुर्ले तालुक्यासह शहर कार्यकारणी बरखास्त!

सावंतवाडी : शिवसेनेची वेंगुर्ले तालुक्यासह शहर कार्यकारणी बरखास्त करण्यात आली असून मी संजू परब आहे जो कधीच परिणामांची चिंता करत नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी त्यांनी वेंगुर्ला तालुक्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक बदलाची मोठी घोषणा केली.

संजू परब पुढे म्हणाले, ​वेंगुर्ला शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून, यासोबतच संपूर्ण तालुका आणि शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. या रिक्त झालेल्या पदावर सचिन देसाई यांची प्रभारी तालुकाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली असल्याची माहितीही श्री. परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.  या मोठ्या संघटनात्मक निर्णयामुळे काही कार्यकर्त्यांनी शिंदे गटातून राजीनामे दिले आहेत, मात्र त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आम्ही जरी राजीनामा दिला असला तरी शिंदे सेनेचे काम सुरूच ठेवणार आहोत.
​या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत घेतली त्यांनी पक्षातून बाहेर पडणाऱ्यांना व अंतर्गत विरोधकांना स्पष्ट इशारा दिलाय.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles