सावंतवाडी : मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट मुंबईच्या वतीने धाकोरे शाळेला संगणक भेट!धाकोरे (वसवाचे तळे) प्राथमिक शाळेला मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने शाळेला आवश्यक असलेला संगणक भेट देण्यात आला.
यावेळी अमित बने (मुख्य विश्वस्त), संजय देवूळकर , अर्जुन पालव, प्रवीण पालव, सुदर्शन राऊळ, सुनील मुळीक, सुहास कदम, अक्षय साटम ,विघ्नेश आपकर ,गणेश मोरमारे, शिक्षक अर्जुन रणशूर आदी उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे शिक्षक अर्जुन रणशूर यांनी स्वागत केले.
धाकोरे वसवाचे तळे प्राथमिक शाळेला आवश्यक असलेल्या संगणक बाबत धाकोरे ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पालव यांनी या बाबत मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट मुंबई यांच्या कडे पाठपुरावा केला होता .पालव यांच्या पाठपुराव्याला अनुसरून मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट मुंबई यांनी धाकोरे वसवाचे तळे प्राथमिक शाळेला एक संगणक भेट दिला.
यावेळी शाळेचे शिक्षक अर्जुन रणशूर,ग्रामस्थ यांनी मातोश्री सेवाधाम आरोग्य ट्रस्ट चे तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पालव यांचे आभार मानले.


