सावंतवाडी : दोस्तीतील ‘राजा माणूस’ आणि युवकांचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे विनोद राऊळ यांचा वाढदिवस भाजपा जनसंपर्क मध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजप अनेक पदाधिकारी आणि युवा नेते उपस्थित होते. यात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याचे युवा नेते विशाल परब, तसेच मनोज नाईक, अनिल निरवडेकर आणि हितेन नाईक यांचा समावेश होता.
या सर्व मान्यवरांनी विनोद राऊळ यांना शुभेच्छा देत त्यांच्या भावी वाटचालीस सदिच्छा दिल्या. तसेच, उपस्थित असलेल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी राऊळ यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली.
वाढदिवसाच्या या जोरदार सेलिब्रेशनमध्ये भाजपच्या युवा नेतृत्वाचे दर्शन घडले, तसेच राऊळ यांच्या नेतृत्वावर युवा वर्गाचा किती विश्वास आहे हे दिसून आले.



