ॲड. प्रा. गणपत शिरोडकर यांच्या वकिली कार्यालयाचे उद्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्या हस्ते होणार उद्घाटन!

सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव – कुंभारवाडी येथील सेवानिवृत्त प्राध्यापक तथा ॲड. गणपत महादेव शिरोडकर यांच्या नवीन वकिली कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उद्या सोमवार दि. ५ जानेवारी २०२६ रोजी सायं. ४.३० वाजता मळगाव येथील श्री निर्मल कुंभारवाडी येथे संपन्न होणार आहे. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोंसले, महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्री. लखमराजे भोंसले, सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी प्रमुख उपस्थितीत ॲड. भालचंद्र शेटकर, ॲड. दिगंबर गावकर आणि मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर यांचा समावेश असून नव्याने सुरू होणाऱ्या या कार्यालयामुळे नागरिकांना न्यायिक सल्ला व सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार आहे.

दरम्यान ॲड. प्रा. गणपत शिरोडकर यांनी यावेळी सर्व नागरिक, नातेवाईक व मित्रपरिवाराने कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles