✍️रूपेश पाटील
सावंतवाडी : नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या दरम्यान सिंधुदुर्गातील राणे बंधूंनी आपापल्या पक्ष वाढविण्याच्या दृष्टिकोनातून जोरदार व प्रामाणिक प्रचार केला. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे व कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी अनुक्रमे भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटाच्या प्रचारासाठी जोरदार कंबर कसली होती. यावेळी अनेकदा प्रसार माध्यमांतून राणे बंधू एकमेकांच्या आमने-सामने असल्याच्या वार्ता देखील प्रसारित झाल्या होत्या. मात्र आज सिंधुदुर्गात राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी अवघं कोकण गोवा सीमेवर एकवटलं होतं. यावेळी हजारोंच्या संख्येने नारायण राणे आणि राणे परिवारावर प्रेम करणारी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती जाणवली. मात्र याच स्वागत सोहळ्याच्या निमित्ताने अवघ्या कोकणने अनुभवलं ते मंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांचे अतूट बंधुप्रेम. दोघांनीही एकमेकांना मिठी मारत व निखळ हास्य आणि विनोदी शैलीत गप्पा मारून तमाम पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुखद अनुभूती दिली.
दरम्यान राणे बंधूंचं हे प्रेम पाहून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अवघा कोकण आनंदमय होऊन नक्कीचं सुखावला आहे, हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिष्याची अजिबात गरज नाही, एवढं नक्की.



