सावंतवाडीतील पत्रकारिता आदर्शवत! : पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांचे गौरवोद्गार! ; प्रेस क्लबच्या वतीने ‘पत्रकार दिन’ उत्साहात साजरा.

सावंतवाडी : ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ ला ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया रचला. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबच्या वतीने सावंतवाडीत पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या उपस्थितीत आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी श्री. चव्हाण यांनी सावंतवाडीतील पत्रकारिता आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार काढले.

 

      

यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष अनंत जाधव, संस्थापक अध्यक्ष सीताराम गावडे, सचिव राकेश परब, खजिनदार संदेश पाटील, आनंद धोंड, शैलेश मयेकर, प्रा. रूपेश पाटील, मदन मुरकर, सहदेव राऊळ, साबाजी परब, निखिल माळकर, संजय पिळणकर, विशाल पित्रे, यशवंत माधव, लक्ष्मण आढाव, रेवती वालावलकर, सुनील आचरेकर, प्रशांत मोरजकर, नाना धोंड, नितीन गावडे, आशिष धोंड आदि उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पत्रकारितेतील महत्त्व सांगितले. तसेच आपण देवगड येथे असताना नेहमी पत्रकार दिनी पोंभुर्ले येथे जात असू. त्यांचे कार्य अफाट उंचीचे होते, असे गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढले. तसेच त्यांच्या एकूण कार्याचे कौतुक केले.

यावेळी सीताराम गावडे यांनी सिंधुदुर्ग प्रेस क्लबच्या कामाची माहिती देत असतना हा प्रेस क्लब एका विशिष्ट परस्थीतीत नावारूपास आला असून प्रेस क्लबचे महत्व त्यांनी पटवून दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रजिस्टर संघटना असून प्रेस क्लबच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात आपणास यश आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकाराचे कार्य महत्वाचे असते. तेवढेच काम हे कार्यालयातील कर्मचाऱ्यांचेही असते. त्यामुळे ते सर्वजण आमच्या प्रेस क्लबचे सदस्य आहेत, असेही यावेळी श्री. गावडे यांनी स्पष्ट केले.

अध्यक्ष अनंत जाधव यांनी प्रेस क्लबच्या माध्यमातून आपण चांगले काम करण्याचा प्रयत्न करीत असून सामाजिक दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून काम करत आहोत. सदस्य कमी असले तरी काम चांगले आहे, असे स्पष्ट केले.

यावेळी प्रा. रूपेश पाटील यांनी प्रेस क्लबच्या कामाबद्दल गौरवोद्गार काढले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राकेश परब यांनी केले.

उपस्थितांचे स्वागत संदेश पाटील, आनंद धोंड यांनी केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles