सवन्त्ब्वडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नगरपालिका सावंतवाडी येथे फिल्ड व्हिजीट आयोजित करण्यात आली.
नवनिर्वाचित नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी विद्यार्थ्यांना नगरपालिकेचे कामकाज, व्यवस्था याबाबत इत्यंभूत माहिती दिली तसेच कर संकलन व प्राप्त कराचा विधायक कामांसाठी होणारा विनिमय, पाणी पुरवठा व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, आगामी प्रकल्प, वाहतूक व्यवस्था व नियमपालन याबद्दल देखील विद्यार्थ्यांना अवगत करण्यात आले.
त्याचप्रमाणे नगरपालिकेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना सावंतवाडी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त केली.

या उपक्रमाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त यवराज श्रीमंत लखमराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या.



