Wednesday, May 21, 2025

Buy now

spot_img

भाजपा युवा नेते विशाल परब यांच्याहस्ते शुभारंभ मेन्स वेअर’चे उद्घाटन.

बांदा : बांदा शहरात सुरू होत असलेल्या ‘शुभारंभ मेन्स वेअर’चे भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न झाले.

उद्योजक भूषण साटेलकर यांनी आज बांदा येथे ‘शुभारंभ मेन्स वेअर”‘ या आपल्या नव्या शोरूमची सुरुवात आजच्या श्रावण सोमवारी केली आहे. हा एक शुभसंकेतच आहे, असे मी मानतो असे उद्गार यावेळी युवा नेते विशाल परब यांनी काढले.

मेन्स स्टाईल हे घोषवाक्य घेऊन शुभारंभ मेन्स वेअरची सुरूवात बांदा शहरात होत आहे. स्टाईल मे रहने का, ही तर बांदावासियांची खासियत आहे, आणि आता हक्काने ही “स्टाईल” जोपासणारा व्यवसायच बांद्याचे उद्योजक श्री भूषण साटेलकर यांनी सुरू केला आहे. त्यांच्या या उद्योगाला मी मनापासून शुभेच्छा देतो. सर्व पुरुषांना स्टाईलमध्ये जगायचा मंत्र आपल्या उद्योगातून जगाला देणाऱ्या भूषण साटेलकर सारख्या माझ्या सहकारी उद्योजक मित्राचा मला मनापासून अभिमान आहे. अशा उद्योगांना भविष्यात फार मोठी व्याप्ती आणि स्थान असणार आहे. त्यादृष्टीने आपण स्थानिक उद्योजक सज्ज होत आहोत, ही परिवर्तनाची नांदी आणि शुभसंकेत आहे, असे उद्गार आज भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी काढले. बांदा शहरात गांधी चौक रोडवर नव्याने सुरू झालेल्या ‘शुभारंभ मेन्स वेअर’ चे उद्घाटन आज हस्ते संपन्न झाले त्याप्रसंगी ते बोलत होते.

शुभारंभ मेन्स वेअर या शोरूम मुळे बांदा शहराच्या व्यावसायिक प्रगतीत मोलाची भर पडली असून ग्राहकांनी याप्रसंगी श्री. भूषण साटेलकर यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. या शोरूमच्या उदघाटनप्रसंगी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या समवेत बांदा सरपंच प्रियांका नाईक,निगुडे माजी सरपंच झेवियर फर्नांडिस, उमेश पेडणेकर,औदुंबर पालव,निखिल कुडव,आशिष झाट्ये, स्वप्निल पिरणकर, अक्षय पिरणकर, विशाल नाईक,अक्षय पिरणकर, रवींद्र पिरणकर, मनोज पिरणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शुभारंभ मेन्स वेअरचे मालक श्री भूषण भालचंद्र साटेलकर आणि साटेलकर परिवारातील सदस्य सौ भार्गवी साटेलकर, भालचंद्र गुरुनाथ साटेलकर, सौ. भारती भालचंद्र साटेलकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करत खास उपस्थित राहिल्याबद्दल पुष्पगुच्छ देत आभार व्यक्त केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles