‘त्या’ गॅस पाईपलाईनचे बेशिस्त काम नगरसेवक देव्या सुर्याजींंनी रोखलं! ; युवराज लखमराजेंनी काढला यशस्वी मार्ग, नगराध्यक्षांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना!

सावंतवाडी : शहरात एम.एन‌.जी‌.एलच्या माध्यमातून गॅस पाईपलाईन टाकण्याच काम सुरू आहे. जुनाबाजार होळीचा खुंट येथे चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल‌ काम येथील नागरिकांनी नगरसेवक देव्या सुर्याजी यांच्या निदर्शनास आणून दिलं. यानंतर श्री. सुर्याजी यांनी हे काम रोखल. तर युवराज लखमराजे भोंसले यांनी घटनास्थळी येत यावर मार्ग काढला. नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या कानावर ही बाब घातली. त्यांनी काम सुरू असताना नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी उपस्थितीत राहावं अशा सुचना केल्या.

जुनाबाजार होळीचा खुंट येथे हे गॅस पाईपलाईनच काम अंतिम टप्प्यात आले असून श्री. नाईक यांच्या घरासमोर बीएसएनएलचे १४ पाईप भुमिगत आहेत.‌ नियमानुसार गॅस पाईपलाईन १ मिटर खोल असणं आवश्यक असताना बीएसएनएलच्या पाईपवरून गॅस पाईपलाईन टाकण्यात येत होती. रस्त्याच्या १ फुट खाली लाईन टाकून नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण होत असल्याने हे काम आम्ही रोखल असं मत नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी व्यक्त केले. तसेच संबंधित कंपनीन‌ काम करताना योग्य खबरदारी घ्यावी. तसेच नगरपरिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच ही काम करण्यात यावी अशा सुचना केल्या. नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले शहरातील इतर कामांची पाहणी करत असल्याने युवराज लखमराजे भोंसले यांनी घटनास्थळी भेट दिली. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेत यातून मार्ग काढला. तसेच नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांना याची कल्पना दिली. त्यांनी नगरपरिषद अधिकाऱ्यांना जातीनीशी उपस्थित राहून तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम करा, गॅस पाईपलाईन कामात हलगर्जीपणा नको अशा सक्त सुचना दिल्या. यावेळी नगरसेवक देव्या सुर्याजी, बीएसएनलचे अधिकारी, एमएनजीएलचे कर्मचारी, येथील रहीवासी देवेंद्र नाईक, श्री. गिरीश नाईक आदी उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles