सावंतवाडी तालुकास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन. ; निमित्त जागतिक हस्ताक्षर दिनाचे.

✍️ भूषण आरोसकर.

सावंतवाडी : जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त श्री सातेरी ग्रंथालय व सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ, नेमळे आयोजित सावंतवाडी तालुकास्तरीय हस्ताक्षर स्पर्धा ही दोन गटांत होणार असून लहान गट पाचवी ते सातवी या गटातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताचे स्वहस्ताक्षरात लेखन करावे तसेच मोठागट आठवी ते दहावी या गटातील विद्यार्थ्यांनी’ प्रतिज्ञा’ स्वहस्ताक्षरात लेखन करुन आपल्या प्रवेशिका मुख्याध्यापकांच्या सहीने श्रीसातेरी ग्रंथालय व सांस्कृतिक कला,क्रीडामंडळ,नेमळे ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग यापत्यावर दि.26 जानेवारीपर्यंत पाठवावे किंवा समक्ष पोहोच करावे असे आवाहन अध्यक्ष आ. भि. राऊळ सर व कार्यकारी मंडळाने केले आहे.लहान गटातील व मोठ्या गटातील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांला 500 रु. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक 400 रू.सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच तृतीय क्रमांक 300 रूप.सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. सावंतवाडी तालुक्यातील

जास्तीत जास्त शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी ग्रंथपाल आरती गावडे, (मोबाईल क्रमांक 7875024424) यावर संपर्क करावा.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles