सॅल्यूट टू सर्व्हिस’ – प्रजासत्ताक दिन विशेष! ; यशवंतराव भोसले सैनिक स्कूलतर्फे आजी-माजी सैनिकांचा स्नेहमेळावा.

सावंतवाडी: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या गौरवपूर्ण निमित्ताने यशवंतराव भोसले सैनिक स्कूल यांच्या वतीने “सॅल्यूट टू सर्व्हिस – आजी माजी सैनिक स्नेहमेळावा” दि.26 जानेवारी 2026 रोजी यशवंतराव भोसले सैनिक स्कूल, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. हा स्नेहमेळावा देशसेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या माजी सैनिकांच्या त्याग, शिस्त व सेवेला मानवंदना देण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे. या माध्यमातून माजी सैनिकांमध्ये संवाद, आठवणींचे आदान-प्रदान तसेच युवा पिढीसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्याचा उद्देश आहे.

कार्यक्रमास माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय, शिक्षणतज्ज्ञ तसेच संरक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात यशवंतराव भोसले सैनिक स्कूलचे कमांडंट ले.कर्नल रत्नेश सिन्हा (नि) हे संरक्षण क्षेत्राभिमुख शिक्षण, शिस्तबद्ध प्रशिक्षण व लष्करी संस्कारांद्वारे सैन्य अधिकारी घडविण्याबाबत मार्गदर्शन करतील. स्नेहमेळाव्यानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या उपक्रमातून माजी सैनिकांचा सन्मान तसेच विद्यार्थ्यांमधील राष्ट्रभक्ती व नेतृत्वगुणांना चालना देण्याचा शाळेचा प्रयत्न आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त सैनिकांनी या स्नेहमेळाव्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन यशवंतराव भोसले सैनिक स्कूलतर्फे करण्यात आले आहे.

नाव नोंदणीसाठी सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करावा किंवा खाली दिलेल्या लिंकला फॉलो करावे.

अधिक माहितीसाठी 9167077940 या क्रमांकावर संपर्क साधावा.

गुगल फॉर्म लिंक –

🫵🫵🫵🫵https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdSZ67e76Lir9TXNxQGLx7nb2q2te7guWwZFBhp6yu-vbl0fg/viewform?usp=header_

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles