कुडाळ : आपल्या लाल मातीत प्रचंड गुणवत्ता आहे. आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची पुणे भरून काढली तर ते यशो शिखरावर पोहोल्याशिवाय राहणार नाहीत, परफेक्ट अकॅडेमीचे काम देशभर पोहोचले असले तरी, तरी आपल्या मातीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्याला वेगळाच उत्साह येतो, असे प्रतिपादन प्रा. राजाराम परब यांनी यावेळी कुडाळ येथे केले.
रोटरी क्लब ऑफ नांदेड सिटी, ज्ञानज्योत सायन्स अकॅडेमी पुणे, आणि परफेक्ट अकॅडेमी सिंधुदुर्ग आयोजित, ‘विज्ञान शाखेतील करिअरच्या संधी व तयारी’ या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. यात प्रा. राजाराम महादेव परब यांचे व्याख्यान पार पडले. यामध्ये इयत्ता अकरावी, बारावी विज्ञान शाखेनंतर करिअरच्या विविध संधी कोणत्या, त्यासाठी कोणकोणत्या प्रवेश परीक्षांचा अभ्यास करणे गरजेचे आहे?, तसेच अकरावीपासून यात प्रवेश परीक्षांच्या रणनीतीबद्दल अभ्यास कसा करावा?, अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
सदर मार्गदर्शन शिबिराचा लाभ दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला. हे व्याख्यान यशस्वीरित्या आयोजित करण्यासाठी कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दिनेश आजगावकर, उपप्राचार्य जुनिअर कॉलेज पी. बी. कदम, ए. ए. पाटील, श्री. चव्हाण सर, श्री. साळवी सर यांनी मोलाचा वाटा उचलला.
दरम्यान परफेक्ट अकॅडेमीच्या वतीने प्रा. राजाराम परब, तसेच सोबत सौ. पूर्वी जाधव, शीतल शितल कांबळी, परिमल धुरी यांनी सहभाग घेतला.