आगामी निवडणुका खा. नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली लढवणार! ; मंत्री उदय सामंत यांनी दिले युतीचे संकेत.

कणकवली : येथील खासदार नारायण राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी जाऊन शिंदे शिवसेनेचे नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज श्री. राणे यांची सदिच्छा भेट घेतली. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. यावेळी मंत्री उदय सामंत यांनी खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पंचायत समिती लढवणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी भाजपा माजी आमदार प्रमोद जठार, अजित गोगटे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, महिला अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, शिवसेना नेते संजय आग्रे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles