नगरसेवक देव्या सूर्याजींच्या दणक्यानंतर नगरपरिषदेला जाग! ; ‘त्या’ रस्त्याच्या डांबरीकरणाला तात्काळ सुरुवात!

सावंतवाडी : मुख्य बाजारपेठेत पाईपलाईनसाठी खोदलेला रस्ता डांबरीकरण करण्यास आज सकाळी प्रारंभ झाला. नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर नगरपरिषद बांधकाम विभाग खडबडून जागा झाला. सकाळपासून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

नळ पाण्याची लाईन बदलण्यासाठी शहरातील मुख्य बाजारपेठ रस्ते खोदण्यात आले होते. मात्र, काम पूर्णत्वास येऊन १० दिवस झाले तरी न.प. च्या बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केलं जातं होतं. केवळ आश्वासन देत वेळकाढूपणा प्रशासन करत होत. यामुळे येथील व्यापारी, रहिवाशांना धूळीचा त्रास सहन करावा लागत होता.‌ यामुळे नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी आक्रमक पवित्रा घेत तात्काळ डांबरीकरण न केल्यास आज माती अन् खडी नगरपरिषदेच्या दारात आणून ओतण्याचा इशारा दिला होता. यानंतर न.प.चा बांधकाम विभाग खडबडून जागा झाला असून आज सकाळपासून डांबरीकरण कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles