दोडामार्ग: माटणे जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे रविकिरण गवस बुधवारी अधिकृत निवडणूक अर्ज भरणार आहेत.
दरम्यान श्री गवस यांनी सांगितले की, आपला
हा लढा बाहेरून आलेल्या कुणाचा नसून, मतदारसंघात जन्मलेला, इथेच मतदान करणारा
आणि जनतेच्या प्रश्नांशी नाळ जोडलेला आपलाच आवाज आहे. हा क्षण केवळ माझा नसून
आपल्या सर्वांच्या हक्काचा, स्वाभिमानाचा आणि परिवर्तनाच्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे.
तरी माटणे मतदारसंघातील सर्व नागरिक , मतदार बंधू भगिनी ,
युवक, महिला, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी
व सामाजिक कार्यकर्ते
आपल्या उपस्थितीने मला आशीर्वादरुपी पाठबळ मिळावे आणि या क्षणाचे आपण सर्व ऐतिहासिक साक्षीदार व्हावेत, अशी नम्र विनंती श्री. गवस यांनी केली आहे.
मतदार संघातील जनतेची उपस्थिती म्हणजे
लोकशाहीवरचा विश्वास आणि
आपल्या माणसाला दिलेला आधार असेल असेही रविकिरण रामदास गवस यांनी म्हटले आहे.



