धनशक्तीविरोधातील लढाईत विजय निश्चित!, मतदारांचा भक्कम पाठिंबा मिळेल! : ठाकरेंचे निष्ठावंत शिलेदार रुपेश राऊळ यांचा ठाम विश्वास. ; राऊळ देणार भाजपाच्या ‘गावडें’ना आव्हान!

सावंतवाडी : “माझी ही लढाई धनशक्तीच्या विरोधात असून या लढाईत विजय निश्चित असल्याचा मला पूर्ण विश्वास आहे. स्थानिक पातळीवर आम्ही सातत्याने जनतेची सेवा केली असून बाहेरील धन सःळतीला तळवडे मतदारसंघातील जनता थारा देणार नाही, असे मत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा तळवडे गटातून ठाकरे सेनेकडून उमेदवारी दाखल केलेले उमेदवार रुपेश राऊळ यांनी व्यक्त केले. आजची लढाई स्थानिक विरुद्ध बाहेरचा अशी असली, तरी मतदारसंघातील जनतेने आजपर्यंत मला जसे प्रेम दिले, तसेच प्रेम या निवडणुकीतही देतील आणि माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


या निवडणुकीत आम्ही चांगले उमेदवार उभे केले असून काही ठिकाणी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एकंदरीत ही निवडणूक आम्ही निश्चितपणे जिंकू, असा ठाम विश्वास रुपेश राऊळ यांनी व्यक्त केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles