ठाणे : शहरातील घोडबंदर येथील ज्येष्ठ नागरिकांचा एक प्रेरणादायी आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम म्हणजे “कांचनपुष्प ज्येष्ठ नागरिक विरंगुळा ग्रुप.”
सर्व मान्यवरांच्या सहभागाने आणि सहकार्याने १ जानेवारी २०२५ रोजी या ग्रुपची औपचारिक स्थापना करण्यात आली.
:
ग्रुपच्या स्थापनेपासूनच प्रत्येक महिन्याला होणाऱ्या संवाद सभांमध्ये मान्यवर सदस्यांचे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे केले जातात आणि आपुलकी, संवाद व संस्कार यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो.




विशेष म्हणजे, लवकरच कांचनपुष्प विरंगुळा ग्रुप १०० सदस्यांची नोंदणी पूर्ण करण्याच्या टप्प्यावर आहे.
या ग्रुपमध्येvकला, संगीत, साहित्य, अध्यात्म, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले
कीर्तिमान, दिग्गज आणि सुजाण नागरिक सहभागी आहेत—
याचा सर्व सदस्यांना अभिमान आहे.



या पवित्र आणि सामाजिक कार्यामध्ये संस्थापक श्री राजू सावंत, श्री. प्रमोद राऊळ, श्री. मोहन कुडवे, श्री. चंद्रकांत मोरे, श्री. किशोर देसाई,
श्री. मंगेश पोकळे, श्री. विजय जोशी, श्री. विजय पांचाळ,
आणि श्री. निलेश राणे यांचे बहुमूल्य योगदान अत्यंत कौतुकास्पद आहे.
तसेच इतर मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे ग्रुपचे सर्व उपक्रम अत्यंत सुयोग्य पद्धतीने पार पडत आहेत.
कांचनपुष्पच्या भावी कीर्तिमान वाटचालीमध्ये
प्रत्येक सदस्याचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, नुकताच “विरंगुळा ग्रुप”चा प्रथम वर्धापनदिन सर्वांच्या मान्यतेने आणि उपस्थितीत
अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा
सन्मानही करण्यात आला.


“विरंगुळा ग्रुप”चे कार्य फक्त परिसरापुरते मर्यादित न राहता
संपूर्ण ठाणे शहर आणि महाराष्ट्र राज्यासाठी
स्फूर्तीदायक ठरावे, असा संकल्प यावेळी सर्वांनी व्यक्त केला.
ज्येष्ठांचे अनुभव, विचार आणि कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत आणि कांचनपुष्प विरंगुळा ग्रुप याचे जिवंत उदाहरण आहे.













