Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

दांडेली गावात ‘बिबट्याची धास्ती’, वरचावाडा परिसरात तीन कुत्री फस्त : भीतीचे वातावरण, बंदोबस्ताची मागणी.

रमेश आरोसकर 

सावंतवाडी :  तालुक्यातील दांडेली-वरचावाडा येथे दिवसाढवळ्या बिबट्याचा संचार ग्रामस्थांना दिसून आला. चार दिवसात तीन कुत्री बिबट्याने फस्त केली. भर वस्तीजवळ बिबट्याचा सुरू असलेल्या वावरामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तत्काळ सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी दांडेली ग्रामस्थ्यांच्या वतीने होत आहे.
वरचावाडा येथील परेश दाभोलकर यांच्या घराजवळ गेले चार दिवस बिबट्याचे दर्शन होत आहे. घरानजीक रानटी प्राणी आल्याने लहान मुलांना बाहेर फिरणे धोकादायक बनले आहे. गेल्या चार दिवसात बिबट्याने एक एक करून तीन कुत्री फस्त केली तर सूर्या नाईक यांचा कुत्रा बिबट्याच्या तावडीतून वाचला. दिवसा ढवळ्या बिबट्याचा घरानजिक सुरू असलेला संचार भीतीदायक आहे. त्यामुळे वनविभागाने सदर बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी दांडेली माजी उपसरपंच योगेश नाईक यांनी केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles