नेत्रदीपक देखावे, शिस्तबद्द मिरवणुकीने वेधले सावंतवाडीकरांचे लक्ष ; २१ दिवसांच्या बाप्पांना भक्तिमय वातावरणात निरोप.

सावंतवाडी :  शहरातील २१ दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायाला मोठ्या भक्तीभावानं वाजत गाजत निरोप देण्यात आला. वारकरी पेहराव, पारंपरिक वाद्य, ढोलताशांचा नाद, मर्दानी खेळ, सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम व आकर्षक देखावे विसर्जन मिरवणूकीत लक्षवेधी ठरले. शेकडो नागरिकांनी हा विसर्जन सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी केली होती. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष व फटाक्यांच्या आतषबाजीने गणरायाचे विसर्जन करण्यात आले.

 

कोकणातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवाडा, उभाबाजार गणेशोत्सव मंडळ व वैश्यवाडा गणेशोत्सव मंडळाच्या २१ दिवसांच्या गणरायाला मोठ्या जल्लोषात निरोप देण्यात आला. लाडक्या गणरायाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते‌. गेले २१ दिवस आरती, भजन, भक्तिमय गीतांच्या आवाजाने सर्वत्र भक्तिमय व चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरा बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकांस प्रारंभ झाला. वारकरी पेहराव, पारंपरिक वाद्य, ढोलताशांचा नाद, मर्दानी खेळ, सामाजिक संदेश देणारे महिलांचे कार्यक्रम, संत तुकाराम व दत्त अवतारासह स्वामी समर्थ, हनुमंताचे आकर्षक देखावे विसर्जन मिरवणूकीत लक्षवेधी ठरले. शेकडो नागरिकांनी हा विसर्जन सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी केली होती. ढोल पथक, महिलांच्या फुगड्या विशेष ठरल्या‌. रात्री उशिरा मोठ्या भक्तिभावाने गणराला निरोप देण्यात आला. विसर्जनस्थळी मोती तलाव येथे नगरपरिषदेच्यावतीन खास आयोजन करण्यात आलं होतं. पोलिसांचा ही कडक बंदोबस्त होता. गणरायाला भक्तिभावाने निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. गणेशभक्तांना कोणतीही उणीव भासू नये यासाठी यंदाही चोख व्यवस्था केली होती.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles