सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांचे यांचे दिनांक 28 जानेवारी रोजी विमान अपघातात बारामती येथे दुर्दैवी निधन झाले. ही गोष्ट फारच धक्कादायक आहे. सन्माननीय अजितदादा यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याचे शांतपणे ऐकून घेऊन काम करण्याचे एकदा ठरवल्यानंतर ते काम होऊनच जायचे असा खाक्या असलेला नेता पुन्हा होणे नाही. दादांच्या निधनाने देशाचे व महाराष्ट्र राज्याचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्ते व जनता हबकून गेली आहे. नियतीचा निर्णय आघात असतो तिथे कोणाचे काही चालत नाही सदर दुःखद घटनेबाबत सावंतवाडी व दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सावंतवाडी येथील कार्यालयात शोकसभा घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. सदरची वेळी तालुकाध्यक्ष उदयराव भोसले, पक्षाचे प्रदेश चिटणीस सुरेश गवस, एमडी सावंत, युवक कार्यकर्ते अनंतराज पाटकर, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय कदम, कामगार सेल जिल्हाध्यक्ष प्रभाकर गावकर शहराध्यक्ष ऑगस्टीन फर्नांडिस, प्रांतिक सदस्य सत्यजीत धारणकर, सत्यवान चेंदवनकर, दीपक देसाई, गुरुदत्त कामत, नंदकिशोर नाईक, दोडामार्ग तालुकाध्यक्ष मेघेंद्र देसाई, नितेश पाटील, शहाजीराव भोसले, राम लाखे, डॉ. तुषार भोसले, सौ. रंजना निर्मल, रामचंद्र निर्मल, शशिकांत तळवणेकर ,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते, सर्वांच्या वतीने लाडके नेते अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.



