भाजपा युवा नेते विशाल परब उद्यापासून महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ मैदानात! ; सुरुवात दोडामार्गपासून, लक्ष मात्र महायुतीच्या निर्विवाद यशावर!

सावंतवाडी: अखेर उद्यापासून भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते विशाल परब यांचा महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ मैदानात उतरणार असून त्याची सुरुवात दोडामार्ग तालुक्यापासून होणार आहे. या दौऱ्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उत्साहीत असून उमेदवारांच्या विजयाचा विश्वास वाढला आहे.

दि. ७ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या जि. प. व पं. स. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपा युवानेते विशालजी परब यांचा हा महायुती उमेदवार प्रचारदौरा होत आहे. दोडामार्ग तालुक्याच्या तीन जिल्हा परिषद व सहा पंचायत समितीमध्ये लढत होत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, कोकणचे नेते खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या निवडणुकीत यापूर्वीच पंचवीस उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने महायुतीचे पारडे विजयाकडे निर्वीवादपणे झुकलेले दिसून येत आहे.

महायुतीच्या प्रचारार्थ उद्या विशाल परब यांचा दोडामार्ग तालुक्याचा दौरा राजकीय उत्सुकतेचा विषय होत आहे. विशालजी परब यांचा ग्रामीण भागात असलेला संवेदनशील जनसंपर्क, युवा वर्गात असणारी मोठी क्रेझ ही या निवडणुकीतदेखील जमेचा भाग ठरणार आहे. महायुतीचे दोडामार्ग तालुक्यातील नऊही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास श्री विशाल परब यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles