पालकमंत्री नितेश राणे यांचा जादुई करिष्मा!, चक्क भुईबावडा येथे उबाठा पुरस्कृत उमेदवारचं आणले भाजपात! ; भुईबावडा पंचायत समितीत उबाठाचे आव्हान संपुष्टात.

वैभववाडी : भुईबावडा पंचायत समितीतील उबाठा पुरस्कृत अपक्ष उमेदवार वसंत मोरे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवानंद पालांडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच मोरे यांनी पार पडलेल्या जाहीर सभेत पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. नामदार नितेश राणे यांनी श्री मोरे यांचे पक्षात स्वागत केले आहे. या निवडणुकीत उबाठाला बसलेला हा चौथा मोठा धक्का मानला जात आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बिनविरोध चा फार्मूला अमलात आणला.यात कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यात फार मोठे यश आले.आठ जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध झाले. तर १७ पंचायत समिती सदस्य बिनविरोध केल्या. याचा प्रभाव आजही निवडणुकांवर कायम आहे. भुईबावडा पंचायत समितीत उबाठा पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते असलेले वसंत मोरे यांनी आपली उमेदवारी भाजपाला पाठिंबा देत भाजप पक्षातच प्रवेश करून विलीन केली आहे.त्यामुळे येथील भाजप समोरील आव्हान संपुष्टात आले आहे. तालुक्यात उबाठा च्या अडचणी एकापाठोपाठ एक वाढत असल्याचे चित्र आहे. श्री. मोरे यांनी आज रीतसर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles