- ✍️ रूपेश पाटील
- सावंतवाडी : संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून असलेली जिल्हा परिषद मतदार संघातील ‘हाय व्होल्टेज’ लढत म्हणजेच तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील संदीप गावडे यांची आहे. संदीप गावडे यांना काही राजकीय विरोधकांनी ‘बाहेरचा’ हे विशेषण लावून कुठेतरी गैरसमज पसरवण्याचा आणि आपल्याच मतदारसंघातील बांधवांना विकासापासून वंचित ठेवण्यासाठीचा एक प्रकारे तगादा लावला आहे. खरंतर संदीप गावडे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे एक उभरते युवा नेतृत्व आहे. विशेष म्हणजे ते बाहेरचे नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच सावंतवाडी तालुक्यातीलच फणसवडे या गावाचे सुपुत्र आहेत. आता आमच्याच लाल मातीतील आमच्या जिल्ह्यातील आणि आमच्याच तालुक्यातील व्यक्तीला सुद्धा जर आम्ही ‘बाहेरचा’ हे विशेषण लावत असू तर आमच्यासारख्या सुशिक्षित माणसालाही विचार करण्याची आज गरज आहे. कारण गेल्या काही वर्षातील संदीप गावडे यांच्या बाबतीत सखोल अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे सावंतवाडी मतदारसंघातील सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला या तीनही तालुक्यात त्यांनी केलेली विकास कामे ही कधीही भेदभाव दर्शविणारी नाहीत. मग आमच्याच मनात त्यांच्याबाबत ‘बाहेरचा’ म्हणून विचार येतो ही संकुचित वृत्ती वाटत नाही का?
असो!,पहिल्याप्रथम या मतदारसंघातील सुज्ञ बांधवांना आणि भगिनींना आज विचार करण्याची गोष्ट आली आहे ती म्हणजे – आपल्या मतदारसंघातील विकास कामे सर्वात जलद कोण करू शकतो?, केंद्र राज्य शासनात सत्ताधारी कोणत्या पक्षाचे आहेत?, आणि त्या पक्षात कोणत्या व्यक्तिमत्त्वाला वरिष्ठ स्तरावरून निधी मिळू शकतो?, ज्याद्वारे रखडलेली प्रकल्प, विकास कामे मार्गी लागू शकतात, तसेच ती कोणतीही असोत त्याकरिता सर्वाधिक निधी कोण आणून शकतो?, या आणि यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधली तर एकच नाव समोरील ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे उमेदवार – संदीप एकनाथ गावडे.
म्हणून मतदार संघातील बांधवांनी एकच विचार करायचा आहे तो म्हणजे “विकास म्हणजे केवळ आश्वासने नव्हे, तर प्रत्यक्षात बदल घडवणारी कृती.”
सावंतवाडी तालुक्यात गेल्या अनेक वर्षांत जे प्रश्न प्रलंबित होते, जे मार्ग, पूल, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि रोजगारासाठी लोक झगडत होते. त्या प्रत्येक प्रश्नाला संवेदनशीलतेने, सातत्याने आणि प्रामाणिकपणे हात घालण्याचे काम युवा नेते संदीप गावडे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि तळमळीने केले आहे.
आंबोली-महादेवगड, दाणोली – देवसू – पारपोली, चौकुळ, माजगाव, असनिये -व रचीवाडी, आंबोली घाट पर्यायी मार्ग अशा अनेक रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामे सुरू झाली.
तसेच तब्बल ३५ वर्षांपासून रखडलेला विलवडे-भालावल धनगरवाडी साकवाचा प्रश्न अवघ्या दोन महिन्यांत मार्गी लागला — हे केवळ राजकीय यश नसून ग्रामस्थांच्या जीवनात आलेला दिलासा आहे.
पावसाळ्यात जीव मुठीत धरून नदी पार करणारे नागरिक, शाळेत जाणारी मुले, बाजारात माल नेऊ न शकणारे शेतकरी — या सगळ्यांच्या वेदना संदीप गावडे यांनी प्रत्यक्ष अनुभवल्या आणि पालकमंत्री मा. ना. श्री. रविंद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून निधी मंजूर करून प्रश्न कायमचा सोडवला.
फणसवडे येथे जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल, 4G टॉवर, नवीन पूल, विहिरी, ओपन जिम, आरोग्य शिबिरे, मोफत औषधे, दिव्यांग व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, खेळाडूंना प्रोत्साहन, सांस्कृतिक उपक्रम, पर्यावरण संवर्धन असे अनेक उपक्रम राबवले त्यांनी आहेत.
विकासाचा एकही घटक असा नाही जिथे संदीप गावडे पोहोचले नाहीत.
म्हणून तळवडेसारख्या मतदार संघाला आज गरज आहे अशा नेतृत्वाची “जे फक्त प्रश्न ऐकत नाही, तर प्रश्न सोडवतो. जे कार्यालयात नव्हे, तर रस्त्यावर, गावात, वाडीत उभे राहून काम करतो. जे युवा असूनही अनुभवी आहे आणि अनुभव असूनही जमिनीशी जोडलेला आहे.”
म्हणूनच,
तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाचा उज्वल, सुरक्षित आणि विकसित भविष्य घडवण्यासाठी
भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व संदीप गावडे यांना ‘बाहेरचा’ हे विशेषण कधीच लागू पडत नाही तर संदीप गावडे म्हणजे ‘हक्काचा आणि कामाचा माणूस’ हे ब्रीद त्यांना अत्यंत लागू पडते. मतदार संघातील सुज्ञ बांधवांनी अफवांवर विश्वास न ठेवता संदीप गावडे यांच्या कार्यपद्धती आणि विकासाचं व्हिजन घेणार दूरदृष्टी असलेलं नेतृत्व याचा विचार अधिक करणे गरजेचे वाटतं.
आपले एक मत विकासासाठी, विश्वासासाठी, आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आहे. म्हणून हा लढा विकासाचा, हक्काचा अन् आपल्या प्रश्नांना तात्काळ सोडविणाऱ्या माणसाचा आहे. ही निवडणूक पदासाठी नाही, तर ही निवडणूक आहे आपल्या वेदनांसाठी, आपल्या प्रश्नांसाठी आणि आपल्या भविष्याकरिता! हा लढा संदीप गावडे तुमच्यासाठी लढवत आहेत.
आज काही लोक पुन्हा फक्त शब्दांची जादू दाखवायला आले आहेत. संदीप गावडे मात्र शब्दांवर नाही कामांवर मत मागणारे आणि विकासाचं व्हिजन घेऊन आपला मतदारसंघ जिल्ह्यात नंबर एक करणारे स्वप्न बाळगणारे हरहुन्नरी युवा नेतृत्व आहेत.
म्हणून आज ठरवा…!
आपल्याला फक्त भाषण, अफवा हव्यात की काम करणारा सामान्य कार्यकर्ता.
फक्त वचने हवीत की प्रत्यक्ष विकास?
जर आपल्याला मुलांचं भविष्य महत्त्वाचं असेल, जर गावाचा विकास महत्त्वाचा वाटत असेल तर आणि तुमच्या प्रश्नांना कायमची उत्तरं हवी असतील…
तर आम्ही केवळ अफवांवर विश्वास न ठेवता आणि काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला बाहेरचा म्हणून त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण न करता भारतीय जनता पार्टीचे युवा नेते संदीप गावडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची आज गरज आहे.
ही लढाई एका व्यक्तीची नाही…
ही लढाई आपल्या सर्वांची आहे!
आपलं एक मत अन्यायाविरुद्ध, थांबलेल्या विकासाविरुद्ध आणि आपल्या हक्कासाठी आहे. म्हणून सजग आणि सुज्ञ मतदार बांधवांनी सखोल विचार आणि चिंतन करून आपले मतदान करावे एवढीच माफक अपेक्षा.!

संदीप गवडे यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे –
१) आंबोली-महादेवगड रस्ता ग्रा. मा. 25 किमी 0/00 ते 2/500 रस्त्याचे सुधारणा व डांबरीकरण करण्यासाठी 70 लाख रक्कम मंजूर.
२) दाणोली-देवसू-पारपोली ग्रा. मा. 20 किमी 0/00 ते 5/200 रस्त्याचे सुधारणा व डांबरीकरण करण्यासाठी 50 लाख रक्कम मंजूर.
३) गेली 35 वर्ष रखडलेला व प्रलंबित असलेला साकव प्रश्न मा. ना. रविंद्र चव्हाण साहेब, पालकमंत्री यांच्या माध्यमातून अवघ्या दोन महिन्यात मार्गी लावला. या पुलाच्या कामामुळे दोन्ही गावातील धनगरवाडीतील दळणवळणासह शेती विकासाला गती मिळणार.
विलवडे भालावल धनगरवाडी वर साकव नसल्याने पावसाळ्यात नागरिकांचे तसेच शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रमाणात हाल होत होते. शेतकरी वर्गाला शेतीतून येणार उत्पादन पावसाच्या काळात बाजारपेठेत किंवा अन्य ठिकाणी घेऊन जाता येत नसे.
अनेक वेळा नागरिकांच्या टु-व्हिलर, टेम्पो पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेले होते.
मुलांना शाळेतून येताना किंवा जाताना चार ते पाच तास नदीचा प्रवाह कमी होई पर्यंय थांबावं लागायचं.
नागरिकांना नदीच्या अलीकडे किंवा पलीकडे जाण्यासाठी जीव मुठीत धरून दोरीच्या सहाय्याने नदी पार करावी लागायची.
हा संपूर्ण विषय ग्रामस्थांकडून समजताच या विषयाची तात्काळ दखल घेत आपल्या जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण साहेबांजवळ विषय मांडला असता त्यांनी हा विषय समजून घेत या कामाला तात्काळ मंजुरी देत प्रशासकीय मान्यता मिळवून 21 लाख 81 हजार रुपये एवढा निधी मंजूर करून दिली.
त्यामुळे विलवडे – भालावल साकव प्रश्न मार्गी लावण्यात यशस्वी झालो. नागरिकांच्या समस्या फक्त जाणून न घेता त्या प्रत्यक्षात सोडविण्यासाठी नेहमीच प्रामाणिक प्रयत्न असतात. एक लोकप्रतिनिधी या नात्याने नागरिकांच्या अपेक्षा आणि त्यांना भेडसावणारे प्रश्न याकडे नेहमी लक्ष ठेऊन असतो, म्हणून वेळोवेळी पाठपुरावा करून माझे कर्तव्य मी पार पाडत असतो. याच कार्यतत्परतेने भविष्यातही असे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबध्द आहे असे आश्वासन उपस्थित नागरिकांना दिले. तसेच नागरिकांनी केलेला आदर सत्कार व स्वागताबद्दल आभार मानले.
४. जलजीवन मिशन अंतर्गत फणसवडे येथे नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाचे श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. योजना लवकरात लवकर पूर्ण करुन कार्यान्वयीत करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. फणसवडे गावात पाण्याचा तुटवडा लक्षात घेता व या मागील योजनांची पार्श्वभूमी लक्षात घेता हि योजना पूर्ण करून तसेच लागल्यास अजून काही वाढीव उपाययोजना करून मा. पंतप्रधान यांचे ”हर घर जल”चे स्वप्न फणसवडे गावासाठी पूर्णत्वास नेण्याचा त्यांचा प्रयत्न राहिल.
५. बरीच वर्षापासून प्रलंबित असलेल्या ग्रामस्थांच्या मागणी नुसार आज श्री लिंगदेव मंदिर येथे नविन विहीरीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
आंबोली कामतवाडी येथील श्री लिंगदेव माऊली मंदिर येथे नविन विहीरीच भूमिपूजन माझ्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.६. फणसवडे येथे 4G टॉवर उभारण्याच्या कामाला मंजुरी.
७. बांदा दाणोली रस्त्याच्या मजबुती करणासाठी १२८ कोटी रक्कम मंजूर कामाला सुरुवात.
८. मळेवाड ता. सावंतवाडी येथे राणेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवीन पुल बनाढणे १ कोटी ५० लाख मंजूर.
९. माजगाव चिपटेवाडी वेत्ये ग्रा. मा. २६४ मध्ये3/00 ते ५/00 रस्त्याचे मजबुतीकरण करणे १ कोटी मंजूर.
१०. आंबोली घाटासाठी पर्यायी मार्गाच्या कामासाठी ७० कोटी भरीव निधी मंजूर.
११. असनिये वाराचीवाडी घारपी ता. सावंतवाडी येथे ग्रा मा ७४ मध्ये १ /४०० ते ५/१०० रस्त्याचे मजबुतीकरण करणे ६० लाख मंजूर.
१२.अनेक वर्षांपासून प्रलंबित गेळे काबुलायातदार गावकार प्रश्न मार्गी लागण्यासाठी आमरण उपोषण प्रशासनाच्या दिलेल्या ग्वाही नंतर तहसीलदार यांच्या हस्ते सोडण्यात आले.
१३.सावंतवाडी नगरपरिषद सफाई कामगारांना मोफत रेनकोट चे वाटप करण्यात आले.
१४.सातुळी खालची वाडी येथे पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या विहिरीचे स्वखर्चाने नूतनीकरण करण्यात आले. विहिरीचा मोडकळीस आलेला भाग सुधारून, डागडुजीसह नवीन राहाट बसविण्यात आली आणि प्लास्टर व रंगरंगोटी करून तिला नव्याने सजविण्यात आले.
1५. सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये गावासाठी दाणोली-देवसू-ओवळीये ग्रा.मा.१८ येथे ०/५०० मध्ये नवीन पुलाच्या बांधणीसाठी ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी स्वप्नपूर्ती अखेर पूर्ण झाली! मा. रविंद्र चव्हाण साहेबांच्या दृढ प्रयत्नांमुळे २०२४ च्या बजेटमध्ये या प्रकल्पासाठी तब्बल ₹१.६० कोटींची मंजुरी मिळाली.
१६.चौकुळ – नेनेवाडी येथील मोठ्या पुलाचे उद्घाटन काल मोठ्या उत्साहात पार पडले. पावसाळ्यात पाण्यामुळे वाहतूक ठप्प होणाऱ्या या पुलासाठी मा.ना.श्री रविंद्र चव्हाण साहेब यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्गाचे पालकमंत्री असताना तब्बल ₹३ कोटींचा निधी दिला.
१७.अनेक वर्षे प्रलंबित चौकुळ जळववाडी येथे रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भव्य भूमिपूजन!
१८.पर्यावरण दिनाच्या पार्श्वभुमीवर आमचे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण साहेब यांनी सांगितलेल्या एक झाड मातृभूमीसाठी या उपक्रमा अंतर्गत आज गेळे कावळेसाद पॉइंट येथे सुमारे १०० झाडांची लागवड करण्यात आली…कावळेसाद पॉइंट हा पर्यटनच्या दृष्टीने सिंधुदुर्गातील अत्यंत महत्वाचा पॉइंट मानला जातो या ठिकाणी रस्त्याच्या दूतर्फा तसेच कावळेसाद परिसरामध्ये फुलझाडांची लागवड म्हणजे भविष्यात कावळेसाद फ्लॉवर व्हॅली म्हणून ओळखले जावे येणाऱ्या पर्यटकांना याठिकाणी येताना संपूर्ण फुलांनी बहरलेले झाडे आणि त्या फुलांचा सडा रस्त्यावर पडलेला असे चित्र पाहता येईल असा माझा संकल्प आहे…केवळ कार्यक्रमापुरते वृक्षारोपण न करता त्याचे जतन संगोपन आणि पूर्णपणे निगा राखण्याची संपूर्ण जवाबदारी सुध्दा या माध्यमातून आम्ही आज घेत आहोत.
१९. राज्यभरात सुरू असलेल्या असमानी संकटामुळे आपातग्रस्त नागरिकांना, शेतकऱ्यांना मदती साठी सीएम रिलीफ फंड करीता जास्तीत जास्त मदत करण्याचे आव्हाहन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आवाहन केलेले होते. आज भाजपाच्या माध्यमातून नमो युवा रन चे आयोजन करण्यात आले होते त्याच औचित्याने सदर धनादेश आज जिल्हा भाजपा अध्यक्ष यांच्या कडे सुपूर्द केला.
२०. नेमळे येथे विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.
२१. जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील गेळे येथील कबुलायतदार गावकर हा प्रश्न स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रलंबित होता, हा प्रश्न सोडवणारच, असे वचन मा. ना. रवींद्र चव्हाण साहेबानी आमरण उपोषणावेळी दिले होते. हे वचनही पूर्ण झाले.
२२. “गाव तेथे ओपन जिम” अंतर्गत प्रत्येक गावामध्ये ओपन जिम उभारण्यात आले.
वैद्यकीय –
१. पाडलोस येथील आर्यनला डोक्यावरील शस्त्रक्रियेसाठी रु.30,000 चे आर्थिक सहाय्य केले.कु.आर्यन भुषण केणी, वय-13 वर्षे, रा- केणीवाडा, पाडलोस ता. सावंतवाडी याच्या मेंदूत गाठ आल्याने तातडीचे ऑपरेशन करावे लागले. त्यावेळी मदत म्हणून त्याच्या आई वडिलांकडे रु.30,000 चा धनादेश सुपूर्द केला. आठवीत शाळेत शिकणारा कु. आर्यन अचानक एक दिवशी त्याचा तोंडातून फेस बाहेर पडू लागला. आई वडिलांनी धावपळ करत निदान करून पुणे येथे सह्याद्री हॉस्पिटल येथे तातडीचे ऑपरेशन केले. कु.आर्यन वरील हि शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडली. लवकरच आर्यन शाळेत दाखल होईल.
२. सांगेली येथे प्राथमिक आरोग्यकेंद्राला तसेच आंबोली प्रथमिक आरोग्यकेंद्र येथे सक्सेशन मशिन प्रदान करण्यात आले.
३.दाणोली बाजारवाडी बुथ यांच्यामध्यामातून मोफत आरोग्य शिबीर व औषधे वाटप कार्यक्रम राबविण्यात आला.
४.कोरोन काळामध्ये अल्सानिक गोळ्यांचे संपूर्ण सावंतवाडी तालुक्यामध्ये वाटप करण्यात आले.
५. रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली.
शैक्षणिक –
१. गेली अनेक वर्षे सावंतवाडी तालुक्यासह जिल्ह्यामध्ये प्रतिवर्षी मोफत वह्या वाटप कार्यक्रम राबविण्यात येतो.
२. कसाल येथे दिव्यांग बांधवांच्या मुलांना वाह्या वाटपाचा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत राबविण्यात आला. यावेळी या मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव या कार्यक्रमास उपस्थित होते.
३. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कास क्र. १ ची इयत्ता आठवी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कु. शमिका गावंडे हिने वीरधारा ५.० या उपक्रमा मध्ये देशात २३ वा क्रमांक मिळवला. खरतर संपूर्ण जिल्ह्याला तसेच सावंतवाडी तालुक्याला आणि कास गावाला अत्यंत गर्व वाटेल अशी चमक शमिका हिने मिळविलेली आहे. तिचा प्रशालेमध्ये जाऊन सत्कार केला तिच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
क्रीडा –
१. क्रिकेट खेळातून चांगले खेळाडू समजत उदयास येतात ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठे व्यासपित मिळावे यासाठी गाव गावात क्रिकेट स्पर्धांना प्रोत्साहन.
२.मान्सून चषक नावाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा खेळविण्यात आली.
३.केसरीचे सुपुत्र विजय आणि लक्ष्मण जंगले या बंधूंनी सातारा विभागस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचा पुढील वाटचालीकरिता त्याला मदत केली व यापुढे देखील लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
४.आदर्श बंड याची mpl 6 मध्ये निवड झाल्याबद्दल क्रिकेट किट देऊन सत्कार करण्यात आला.
५. फुटबॉल स्पर्धेत स्थानिक खेळाडू उतरावे हे व्हिजन घेऊन सावंतवाडीत मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबीर आणि निवड चाचणीचा शानदार शुभारंभ.
सांस्कृतिक –
१. सावंतवाडी, वेंगुर्ला , दोडामार्गमध्ये प्रतिवर्षी मोफत भजन साहित्याचे वाटप.
२. म्हाळाईदेवी कला व क्रिडा मंडळ तळवडे आयोजित दिपावली निमित्त कार्यक्रमास उपस्थित होतो. आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक अश्या विविध सेवाभावी कार्य हे मंडळ राबवते. अष्टपैलू आदर्श पुरस्कार विजेते श्री. तेजस बांदिवडेकर सरांना आज माझ्या हस्ते “परिवर्तन गौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
३. श्री म्हळाईदेवी कला क्रीडा मित्रमंडळ तळवडे यांच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्तर आयोजित कार्यक्रमास काल हजेरी लावली त्यावेळी मंडळाला शुभेच्छा दिल्या व समाजातील विलोभनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
४. लोककला दशावतारला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहण्यासाठी सदैव कातीबद्ध.
५. राज्यस्तरीय नृत्योत्सव स्पर्धा २०२४ चे आयोजन दिनांक १५ मे २०२४ रोजी करण्यात आले.
६. संदिप एकनाथ गावडे मित्रमंडळ आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी “सांस्कृतिक सावंतवाडीत जल्लोष युवाईचा – सुंदरवाडी नवरात्रोत्सव २०२४!” आयोजित करण्यात आला.
७. प्रतिवर्षी सावंतवाडी मध्ये सुंदरवाडी दहीहंडी साजरा करण्यात येतो.



