मुंबई विद्यापीठाच्या उडान महोत्सव २०२६ चे उद्या एसपीके महाविद्यालयात आयोजन.

सावंतवाडी : येथील एस पी के महाविद्यालयात उद्या बुधवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने उडान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले, मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. बळीराम गायकवाड, तसेच डॉ. कुणाल जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 15 महाविद्यालय सहभागी होणार असून या महोत्सवा अंतर्गत पथनाट्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, भित्तीचित्रे स्पर्धा, आणि सृजनशील लेखन या स्पर्धा संपन्न होणार आहे या महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंधरा महाविद्यालयातील सुमारे 250 विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles