मंत्री नितेश राणे यांनी केले पवार कुटुंबियांचे सांत्वन. ; पार्थ पवार यांची भेट घेत दिला भावनिक आधार.

बारामती : महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे. दरम्यान आपल्या ट्विटर अकाउंट वर मंत्री राणे यांनी अजित दादा पवार यांना आपली आदरांजली देखील वाहिली आहे. “महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.

आज बारामती येथे जाऊन स्व.अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पार्थ पवार यांची भेट घेऊन पवार कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात सहभागी होत सांत्वन केले. या दुःखातून सावरण्याचे बळ त्यांना मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना !

#भावपूर्ण_श्रद्धांजली., अशी आदरांजली मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles