सावंतवाडी : तालुक्यातील इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघ सध्या एका राजकीय वर्चस्वाच्या लढाईचे रणांगण ठरत असून, महायुतीचे अधिकृत उमेदवार शावियर फर्नांडिस यांनी प्रचाराच्या मैदानात आक्रमक नेतृत्व, संघटनात्मक ताकद आणि जनतेशी थेट संवाद यांच्या जोरावर निर्णायक मुसंडी मारली आहे.
इन्सुली, वाफोली, कास यांसह परिसरातील गावोगावी फिरताना, प्रत्येक चौकात, प्रत्येक चर्चेत आणि प्रत्येक घरात “फर्नांडिस” हेच नाव घुमताना दिसत आहे. मतदारांकडून मिळणारा उत्स्फूर्त, विश्वासार्ह आणि सातत्यपूर्ण प्रतिसाद पाहता, ही निवडणूक आता एकतर्फी झुकत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
राजकीयदृष्ट्या पाहता महायुतीची संघटनात्मक ताकद, स्थानिक पातळीवरील विश्वासार्ह उमेदवारी, आणि विकासकेंद्री स्पष्ट भूमिकायांचा त्रिवेणी संगम शावियर फर्नांडिस यांच्या प्रचारात ठळकपणे दिसून येत आहे.

दुसरीकडे, विरोधकांकडे ना ठोस मुद्दे, ना प्रभावी नेतृत्व, ना जमिनीवरची पकड असल्याने प्रचार केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. जनतेपासून तुटलेले नेतृत्व आणि दिशाहीन रणनीती यामुळे विरोधकांची राजकीय घालमेल उघडपणे समोर येत आहे.

शावियर फर्नांडिस यांनी प्रचारात विकास, पारदर्शकता, स्थानिक प्रश्न आणि भविष्यातील स्पष्ट आराखडा मांडत, केवळ आश्वासनांवर नव्हे तर कामाच्या विश्वासावर मतदारांचे मन जिंकले आहे. त्यामुळे ही निवडणूक आता व्यक्ती विरुद्ध व्यक्ती न राहता, कार्यक्षम नेतृत्व विरुद्ध निष्क्रियतेची बनल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
एकंदरीत पाहता इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघात शावियर फर्नांडिस यांनी आघाडी घेतली असून, इन्सुली पट्ट्यातील निर्णायक पाठिंबा महायुतीच्या विजयाची पायाभरणी करत आहे.
निकालाच्या दिवशी या मुसंडीचे रूपांतर भक्कम आणि स्पष्ट विजयात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



